Ahilyanagar News : केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून 2022-23 च्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वत मालाची घोषणा करण्यात आली होती. याच अनुषंगाने राज्यातील विविध रोपवे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने राज्यातील तब्बल 29 रोपवे प्रकल्पांना मान्यता दिली असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ रोपवे प्रकल्पांचा समावेश होतो.
अहिल्यानगर मध्ये देखील लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर रोपवे तयार होणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की अहिल्यानगर जिल्ह्यातील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर असून या ठिकाणी आता रोपवे तयार केला जाणार आहे यासोबतच हरिश्चंद्रगडावर सुद्धा रोपवे तयार केला जाणार असून याला सरकारकडून मान्यता मिळाली आहे.

या दोन ठिकाणांसोबतच जिल्ह्यातील मढी ते मायंबा दरम्यानही रोपवे तयार केला जाणार असून यासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ गड व बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ गड असा 3.6 किलोमीटर लांबीचा रोपवे तयार केला जाणारा आहे.
फडणवीस सरकारने नुकतीचं या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. आमदार मोनिका रांजणे यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून हा रोपवे प्रकल्प तयार झाल्यानंतर भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ गड व श्रीक्षेत्र सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ गड यादरम्यान तब्बल 3.6 किलोमीटर लांबीचा रोपवे विकसित केला जाणार असल्याने कानिफनाथ गडावरून मच्छिंद्रनाथ गडावर जाणे सोयीचे होणार आहे.
खरे तर कानिफनाथ गडावर आणि मच्छिंद्रनाथ गडावर भाविकांची मोठी वर्दळ असते. यामुळे या दोन्ही गडादरम्यान थेट कनेक्टिव्हिटी असायला हवी अशी मागणी होती. दरम्यान याचा मागणीच्या अनुषंगाने आमदार मोनिकाताई राजळे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला.
आता रांजळे यांचा हा पाठपुरावा यशस्वी झाला असून सरकारने या रोपवे प्रकल्पाला मान्यता देत 125 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केलेला आहे. श्रीक्षेत्र मढी येथे कानिफनाथ यांची संजीवन समाधी असून श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे.
यामुळे या दोन्ही ठिकाणी नाथभक्तांची दरवर्षी लाखोंच्या संख्येने गर्दी होत असते. दरम्यान याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाच्या माध्यमातून या दोन्ही तीर्थक्षेत्रांदरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रोपवे तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे.