Ahilyanagar News : पुणे आणि अहिल्या नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि अगदीच महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे ते नगर जिल्ह्यातील शिर्डी यादरम्यानचा प्रवास आगामी काळात आणखी सोयीचा आणि सुपरफास्ट होणार आहे.
कारण की जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रस्ते मार्ग प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. कारण, पुणे ते शिर्डी यादरम्यानच्या प्रवासाचे अंतर जवळपास 60 किलोमीटरने कमी होणार आहे.पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या राहाता ते संगमनेर तालुक्यातील पानोडीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या नव्या काँक्रिट रस्त्यामुळे हे अंतर सुमारे 50 ते 60 किलोमीटरने कमी होणार आहे.

पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा हा मार्ग राहाता ते संगमनेर तालुक्यातील पानोडीपर्यंत असा जवळपास 36 किलोमीटर लांब राहणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 154 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान आता आपण या नवे रस्ते प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा रस्ता कोण कोणत्या गावांमधून जाणार आहे याची माहिती आता आपण पाहणार आहोत.
कोणत्या गावांमधून जाणार रस्ता?
खरे तर पुणे ते शिर्डी यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दररोज पुण्यातील शेकडो लोक साईनगरीत दर्शनासाठी येतात. मात्र साई भक्तांना शिर्डीला येताना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो.पण या राहता ते पानोडी दरम्यान तयार होणाऱ्या नव्या काँक्रीट रस्त्यामुळे पुणेकरांचा शिर्डीला जातानाचा तब्बल 60 किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. हा नवीन रस्ता राहाता, दहेगाव, केलवड, पिंपरी-लोकाई, लोहारे, निमगाव जाळी, आश्वी, शिपलापूर आणि पानोडी या गावांतून जाणार आहे.
शिर्डीला जाण्यासाठी जलद मार्ग
त्यामुळे साईभक्तांना शिर्डीला जाण्यासाठी सुटसुटीत आणि जलद मार्ग मिळणार असून, स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि व्यावसायिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. हा मार्ग त्यासंबंधीत गावांमधील जनतेसाठी तर महत्त्वाचा ठरणारच आहे शिवाय या परिसराचा एकात्मिक विकास यामुळे सूनिश्चित होणार आहे. या मार्गाची रुंदी 7 मीटर ठेवण्यात आली असून तो दोन पदरी असणार आहे.
यामुळे वाहतुकीला वेग आणि सुरक्षितता मिळणार आहे. रस्ता तयार करताना 10 मीटरपर्यंत काँक्रिटकरण करण्यात येणार आहे. विशेषतः केलवड, आश्वी आणि शिपलापूर या ठिकाणी रस्ता 14.5 मीटर रुंद असणार आहे.या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झाले असून ते 30 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पण या रस्त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहील.