Ahilyanagar Railway : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने श्रीक्षेत्र तिरुपती येथे भगवान तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी नवीन गाडी सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. श्रीक्षेत्र शिर्डी ते श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी यादरम्यान ही नवीन गाडी सुरू करण्यात येणार आहे.
यामुळे शिर्डी आणि तिरुपती हे दोन्ही प्रमुख तीर्थक्षेत्रे रेल्वे सेवेने थेट कनेक्ट होणार आहेत. यामुळे शिर्डीहुन तिरुपतीला अन तिरुपतीहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान आता आपण शिर्डी ते तिरुपती दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच या गाडीच्या एकूण किती फेऱ्या होणार ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार या संदर्भातही आज आपण या लेखातून माहिती पाहणार आहोत.
कसे राहणार शिर्डी – तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक ?
शिर्डी तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन ला महाराष्ट्रातील तब्बल सात महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ह्या संबंधित भागातील भाविकांना या गाडीचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. या गाडीबाबत बोलायचं झालं तर ही गाडी 4 ऑगस्ट 2025 पासून सुरु होईल आणि 29 सप्टेंबर पर्यंत चालवली जाणार आहे.
ही एक साप्ताहिक गाडी राहील म्हणजे आठवड्यातून एक दिवस चालवली जाईल. यातील शिर्डी – तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन शिर्डी रेल्वे स्थानकावरून प्रत्येक सोमवारी सायंकाळी 7:35 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे 1. 30 वाजता तिरुपती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तिरुपती शिर्डी विशेष एक्सप्रेस ट्रेन बाबत बोलायचं झालं तर ही गाडी तिरुपती रेल्वे स्थानकावरून प्रत्येक रविवारी पहाटे चार वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 10:45 वाजता शिर्डी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या शिर्डी ते तिरुपती दरम्यान 18 फेऱ्या होतील अशी माहिती समोर आली आहे. म्हणजे शिर्डी ते तिरुपती अशा नऊ आणि तिरुपती ते शिर्डी अशा नऊ फेऱ्या होणार आहेत.
शिर्डी – तिरुपती विशेष गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार
शिर्डी – तिरुपती विशेष गाडीला या मार्गावरील 13 हुन अधिक रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही गाडी या मार्गावरील कोपरगाव, मनमाड, नागरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर रोड, बीदर, सिकंदराबाद, नलगोंडा, तेनाली, गुडूर, रेणिगुंटा इत्यादी महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार अशी माहिती देण्यात आली आहे.