Ahmednagar Jilha Sahkari Bank : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. दरम्यान, याच सणासुदीच्या हंगामात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्यांना अहमदनगर मध्ये नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पद भरती जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा बँकेने या पद भरतीची सविस्तर जाहिरात देखील निर्गमित केली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज सुद्धा मागवले जात आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण या पदभरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या पदभरतीची सविस्तर माहिती.
कोणत्या पदांसाठी भरती होणार?
लिपिक, वाहनचालक, सुरक्षा रक्षक, जनरल मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), इन्चार्ज या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती जागांसाठी होणार भरती?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार लिपिक पदाच्या 687, वाहन चालक पदाच्या चार, सुरक्षारक्षक पदाच्या पाच तसेच इतर सर्व पदाच्या म्हणजे जनरल मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), इन्चार्ज प्रथम श्रेणी पदाच्या प्रत्येकी एक जागा भरल्या जाणार आहेत. अर्थातच या पद भरती अंतर्गत एकूण सात रिक्त पदांच्या 700 जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
लिपिक : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MS-CIT उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहे. या पदासाठी 21 ते 40 वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.
वाहनचालक : अधिसूचनेत सांगितल्याप्रमाणे या पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण अन हलके वाहन चालक परवाना असणारे उमेदवार पात्र राहणार आहेत. मात्र यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी 21 ते 40 वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.
सुरक्षा रक्षक : या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट उमेदवार पात्र राहणार आहे. या पदासाठी 21 ते 45 वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.
जनरल मॅनेजर : या पदासाठी किमान 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) पदवीधारक उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच संबंधित कामाचा 12 वर्षाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. या पदासाठी 32 ते 45 वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.
मॅनेजर : या पदासाठी किमान 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS पदवीधारक उमेदवार पात्र राहणार आहेत. सोबतच या संबंधित कामांचा दहा वर्षाचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे. या पदासाठी 30 ते 40 वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.
डेप्युटी मॅनेजर : किमान 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS पदवीधारक उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे. तसेच सदर उमेदवाराला या कामाचा आठ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी 30 ते 35 वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.
इन्चार्ज प्रथम श्रेणी : किमान 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS पदवीधारक उमेदवार या पदासाठी पात्र राहतील. सोबतच संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. या पदासाठी 28 ते 35 वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.
अर्ज कुठं अन कसा करायचा?
या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. https://adccbanknagar.in/ या वेबसाईटवर जाऊन इच्छुक व्यक्तींना आपला अर्ज सादर करता येणार आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
सध्या या पदभरतीसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 27 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
पदभरतीची जाहिरात कुठे पाहणार
या पदभरतीची सर्व डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर एकदा या भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. लिपिक, वाहनचालक आणि सुरक्षारक्षक पदाच्या भरतीची जाहिरात https://drive.google.com/file/d/1rLEsHbktgcoV1icKlteKg3xjzqhNsy6w/view?usp=sharing या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच, उर्वरित पदांची जाहिरात https://drive.google.com/file/d/1Tl9yA_47ymlCor-XGP-DpAf-348FYqQq/view?usp=sharing या लिंक वर उपलब्ध आहे.