Ahmednagar Kopargaon Railway News : पुणे नागपूर अहिल्यानगर कोपरगाव येथील रेल्वे प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्याआधीच आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते आणि हीच गोष्ट विचारात घेऊन रेल्वेच्या माध्यमातून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
पुणे आणि नागपूर दरम्यान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत नागपूर ते पुणे दरम्यान चार विशेष सुपरफास्ट गाड्या धावणार आहेत.

या गाड्या अहिल्यानगर बेलापूर कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर सुद्धा थांबा घेणार आहे. साहजिकच या गाड्यांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायक होणार आहे.
दरम्यान, आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि या गाड्या कुठे कुठे थांबा घेणार या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
कसं असणार वेळापत्रक?
गाडी क्रमांक ०१४६९ पुणेहून मंगळवारी दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि बुधवारी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी ८ एप्रिलपासून २४ जूनपर्यंत दर आठवड्याला धावेल.
याच मार्गावर, गाडी क्रमांक ०१४७० नागपूरहून बुधवारी सकाळी ८.०० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्याला पोहोचेल.
याशिवाय, गाडी क्रमांक ०१४६७ पुण्याहून ९ एप्रिलपासून २५ जूनपर्यंत दर बुधवारी दुपारी ३.५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
तर गाडी क्रमांक ०१४६८ नागपूरहून १० एप्रिलपासून २६ जूनपर्यंत दर गुरुवारी सकाळी ८.०० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल.
विशेष गाडी कुठे कुठे थांबणार
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या विशेष गाडीला अहिल्यानगर आणि कोपरगाव मध्ये सुद्धा थांबा मंजूर करण्यात आला आहे. उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव,
भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे दिले जाणार आहेत. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक पर्याय मिळणार असून गर्दीचा ताण काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.