अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलले की शहराचे ? अहिल्यानगर नामकरणाच्या सरकारी आदेशात मोठी माहिती उघड

गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगरचे नाव चेंज झाले पाहिजे अशी मागणी केली जात होती. जिल्ह्यातील नागरिकांच्या माध्यमातूनही वेळोवेळी यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. शासनाने देखील यासंदर्भात वेळोवेळी आपली भूमिका जाहीर केली. मात्र वर्तमान शिंदे सरकारने नामांतरणाचा हा विषय निकाली काढण्याचा निर्णय घेतला.

Published on -

Ahmednagar Name Changed To Ahilyanagar : अहमदनगर आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने अहमदनगरच्या नामांतरणाच्या प्रस्तावाला नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे. यानुसार आता नगरला अहिल्यानगर ही नवीन ओळख मिळाली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे की फक्त शहराचे नाव बदलले आहे? याबाबत जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती.

मात्र आता ही संभ्रमावस्था दूर होणार आहे. कारण की शासनाने नुकतेच एक राजपत्रक प्रसिद्ध केले असून यामध्ये अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर असे करण्यात आले असल्याचे म्हटले गेले आहे. म्हणजेच जिल्ह्याचे नाव अहमदनगर असेच राहणार आहे.

काल अर्थात 4 ऑक्टोबरला हे शासन राजपत्रक प्रसिद्ध झाले आहे. शासनाचे उपसचिव दि ब मोरे यांच्या नावाने काल हे राजपत्रक प्रसिद्ध झाले. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अहमदनगर शहराच्या नामकरणास गृह मंत्रालयाने १ ऑक्टोबर रोजी अनुमती दिली.

यानुसार, या अधिसूचनेद्वारे अहमदनगर शहराचे नाव बदलून ते ‘अहिल्यानगर, तालुका व जिल्हा अहमदनगर’, असे करण्यात येत असल्याची माहिती या राजपत्रकात देण्यात आली आहे. म्हणजेच आता अहमदनगर शहर हे अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार आहे.

मात्र तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव आधीचेच म्हणजेच अहमदनगर असेच राहणार आहे. खरे तर अहमदनगरच्या नामांतरणाचा हा मुद्दा फार जुना होता. गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगरचे नाव चेंज झाले पाहिजे अशी मागणी केली जात होती.

जिल्ह्यातील नागरिकांच्या माध्यमातूनही वेळोवेळी यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. शासनाने देखील यासंदर्भात वेळोवेळी आपली भूमिका जाहीर केली. मात्र वर्तमान शिंदे सरकारने नामांतरणाचा हा विषय निकाली काढण्याचा निर्णय घेतला.

या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने चौंडी येथील एका जाहीर सभेत अहमदनगरचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ असे केले जाणार अशी मोठी घोषणा केली.

पुढे राज्य शासनाने नामांतरणाच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आणि याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला. या प्रस्तावाला आता केंद्राने हिरवा झेंडा दाखवला आहे.

केंद्राच्या या निर्णयानंतर आता शासनाने याबाबतचे शासन राजपत्रक निर्गमित केले आहे. या शासन राजपत्रकात शहराचे नाव अहिल्यानगर असे करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून तालुका आणि जिल्ह्याचे नाव हे अहमदनगर असेच राहणार असेही यावरून स्पष्ट होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe