Ahmednagar News : वाढते शहरीकरण आणि कमी होत चाललेले जंगल यामुळे जंगलातील प्राणी आता मानवी वस्तीत घुसु लागले आहेत. वाघ, बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. दरम्यान अहमदनगर शहरात देखील गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर पाहायला मिळत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आगरकर मळा रेल्वे स्टेशन परिसरातील गायके मळा या भागात दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता. विशेष म्हणजे या बिबट्याने परिसरातील अनेक भटके कुत्री आणि डुकरांचा फाडशा पाडला होता.
यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण होते. रात्री अप-रात्री परिसरातील नागरिक घराबाहेर निघायलाही घाबरत होते.
परिणामी येथील नागरिकांच्या माध्यमातून परिसरात बिनधास्त वावरणाऱ्या या बिबट्याला जेरबंद केले पाहिजे अशी मागणी वन विभागाकडे केली जात होती.
या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला पाहिजे अशी मागणी या परिसरातील नागरिकांची होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर गायके मळा परिसरात वन विभागाने गेल्या एका महिन्यापासून पिंजरा लावून ठेवला होता.
दरम्यान, आज 17 एप्रिल रोजी म्हणजेच तब्बल दोन महिन्यांनंतर आणि पिंजरा गायके मळा परिसरात लावल्यानंतर एक महिन्यांनी हा बिबट्या या पिंजऱ्यात अडकला आहे. परिसरात वावरणारा हा बिबट्या जेरबंद झाला असल्याने येथील नागरिकांनी अखेर कार सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
तब्बल दोन महिने या परिसरात बिबट्याचा वावर होता. बिबट्याने या दोन महिन्याच्या काळात अनेक कुत्र्यांचा आणि डुकरांचा फाडशा पाडला होता.
यामुळे या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले होते. आता मात्र हा बिबट्या पकडला गेला असल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.