Ahmednagar News : राज्यात सध्या अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेती क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झाले आहे. शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती ही प्रथमच आली आहे असे नाही तर वारंवार यांसारखी संकटे शेतकऱ्यांच्या पुढ्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मात्र हवामानात होत असलेल्या बदलामुळे निसर्गाचे चक्र पूर्णपणे प्रभावित झाले असल्याने या नैसर्गिक संकटांची तीव्रता अधिक जाणवत आहे.
यामुळे उन्हाळ्यातही पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नाही. विशेष म्हणजे याचा फटका फक्त एखाद्या शेतकऱ्याला बसतो असं नाही तर ज्या भागात असं हवामान तयार होत त्या परिसरातील सर्वच शेतकरी यामुळे चांगलेच प्रभावित होतात. या परिस्थितीमध्ये मात्र शेतकऱ्यांना अधिक उत्पादन खर्च करून शेतमाल उत्पादित करावा लागतो.
कित्येकदा शेतकऱ्यांना या अशा संकटांमुळे कोणत्याच पिकातून फारसे उत्पादन मिळत नाही. अन जरी शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले तर बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाही. या अशा दुहेरी संकटांमुळे कायमच शेतकऱ्यांची कोंडी होत असते. मात्र तरीही शेतकरी या संकटातून सावरत, संकटांचा प्रभावीपणे सामना करत शेती मधून चांगली कमाई करण्याची किमया साधत आहे. आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून कमी खर्चात आणि कमी जमिनीतून चांगले विक्रमी उत्पादन शेतकरी मिळवत आहेत.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये देखील असाच एक नवीन आणि कौतुकास्पद प्रयोग समोर आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीमानुर या गावातील एका युवा शेतकऱ्याने चक्क पिवळ्या कलिंगडची शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे या पिवळ्या कलिंगडाच्या लागवडीतून या युवा शेतकऱ्याला चांगली कमाई होणार आहे. टाकळीमानुर या गावातील संदीप रोडे या युवा शेतकऱ्यांनी आपल्या दीड एकर शेत जमिनीवर कलिंगडची लागवड केली आहे. यात 3 वेगवेगळ्या जातींची लागवड केली आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! आता महाराष्ट्रात NA टॅक्स लागणार नाही; महसूल मंत्री विखे पाटलांची मोठी घोषणा
या तीन जातींच्या कलिंगडाचे रंग देखील वेगवेगळे आहेत. यामध्ये बाहेरून पिवळं दिसणार कलिंगड आतून लाल आहे तर बाहेरून हिरवे दिसणारे कलिंगड आतून पिवळे आहे. यामुळे सध्या या अनोख्या प्रयोगाची परिसरात चर्चा आहे आणि या युवा शेतकऱ्याने केलेले हे धाडस सध्या परिसरात चर्चेचा विषय आहे. विशेष म्हणजे संदीप यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने या कलिंगडची शेती केली आहे. अॅग्रीफाईन या कंपनीसोबत संदीप यांनी करार केला आहे. यानुसार कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे आणि रोपे दिले जातात. शेतमाल देखील स्वतः कंपनीच खरेदी करते.
इतर व्यापाऱ्यांपेक्षा चार ते पाच रुपये अधिक दर देऊन शेतमाल कंपनीच्या माध्यमातून खरेदी केला जाणार असल्याची माहिती संदीप यांनी दिली आहे. यामुळे विक्रीसाठी त्यांना कुठेही वणवण भटकण्याची गरज नाही. बाजार भाव देखील इतरांपेक्षा अधिक मिळणार आहे म्हणजे या पिकातून त्यांना शाश्वत उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे. संदीपने सांगितले की, त्यांना या पिकासाठी दीड एकरात जवळपास 70 ते 80 हजाराचा उत्पादन खर्च आला असून यातून त्यांना 40 ते 45 टन माल मिळणार आहे. एकंदरीत दीड एकरच्या या शेतीत त्यांना लाखोंची कमाई होण्याची आशा आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा
कोणत्या कलिंगडची केली लागवड?
संदीपने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मनू सीड्स या कंपनीच्या आरोही, सरस्वती आणि विशाल यां 3 जातींची लागवड केली आहे. यामध्ये आरोही या जातीचे कलिंगड वरून काळे आणि आतून पिवळे आहे. ते सांगतात की या जातीच्या कलिंगडची चव ही सेम अननस सारखी आहे, म्हणून याला बाजारात देखील मोठी मागणी आहे. विशाला या जातीचे कलिंगड वरून पिवळे आणि आतून लाल आहे. हे कलिंगड मात्र इतर कलिंगडच्या तुलनेत चवीला अधिक गोड आहे. तसेच सरस्वती या जातीचे टरबूज बाहेरून हिरवेगार आणि आतून लाल आहे.
हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय; पगारात होणार तब्बल 8000 ची वाढ