अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी करून दाखवलं ! सात महिन्यांची मेहनत घेऊन शेतकऱ्यांसाठी तयार केलं अद्भुत यंत्र, वाचा…

Ajay Patil
Published:

Ahmednagar News : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी देशातील संशोधकांच्या माध्यमातून तसेच शास्त्रज्ञांच्या माध्यमातून कायमचे नवनवीन शोध लावले जात आहेत.

या कामी देशातील प्रमुख कृषी संशोधन संस्था तत्परतेने काम करत आहेत. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, त्यांना शेती करताना अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून वेगवेगळे शोध लावले जात आहेत.

वेगवेगळे यंत्र विकसित केले जात आहेत. पीक उत्पादनात वाढ व्हावी म्हणून वेगवेगळ्या पिकांच्या जाती विकसित करण्याचे काम सुरू आहे. अशातच अहमदनगरच्या कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट यंत्र विकसित केल आहे.

हे पण वाचा :- सोयाबीनच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आणि त्यांच्या विशेषता, पहा…

हे यंत्र शेतकऱ्यांना पेरणी करताना बहुउपयोगी सिद्ध होणार असून शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान येणाऱ्या एक ना अनेक अडचणी या यंत्रामुळे दूर होणार आहेत. विशेष बाब म्हणजे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या यंत्राला देशपातळीवर झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.

हे स्वयंचलित रोप पेरणी यंत्र या राष्ट्रीय स्पर्धेत चर्चेचा विषय ठरले. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या 25 विद्यार्थ्यांच्या टीमने या यंत्राची निर्मिती केली आहे.

या यंत्राची निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या यंत्राच्या माध्यमातून एकाच वेळी टोमॅटो, मिरची, वांगी यासह विविध रोपांसाठी दोन सऱ्या पाडून त्या सऱ्यांच्या मधील भरवशावर रोपाची लागवड होणार आहे. 

हे पण वाचा :- 10वी, 12वीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार दहा हजार रुपये ! कोणते विद्यार्थी राहणार पात्र? वाचा….

याचबरोबर रोपाभोवती मल्चींगपेपर अंथरत रोपाच्या शेजारून ठिबक सिंचनाची नळीही हे यंत्र पसरवणार आहे. म्हणजेच यंत्र एक आणि काम अनेक अशी या यंत्राची विशेषता आहे.

या यंत्रासाठी विद्यार्थ्यांना सात महिने कष्ट घ्यावे लागले आहेत.सात महिने या प्रकल्पावर काम केल्यानंतर या विद्यार्थ्यांना हे यंत्र बनवण्यात यश आले आहे.यासाठी विद्यार्थ्यांना 65 हजारापर्यंतचा खर्च आला आहे.

या यंत्रामुळे शेतकऱ्यांना पेरणी करताना मोठी सुविधा उपलब्ध होणार असून यामुळे पैशांची बचत होणार आहे शिवाय वेळेचीही बचत होणार आहे. एका यंत्रात पेरणीची अनेक कामे होणार आहेत म्हणून शेतकऱ्यांसाठी हे यंत्र फायदेशीर ठरेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्यातील ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर, वाचा…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe