Ahmednagar Railway News : अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर सालाबादाप्रमाणे यंदाही 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा होणार आहे. या दिवशी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरातील दीक्षाभूमी येथे आंबेडकरवादी अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
यंदाही उपराजधानी नागपूर येथे बौद्ध अनुयायी धम्मचक्र परिवर्तन दिनी दीक्षाभूमीवर गर्दी करणार आहेत. मुंबई पुणे सोलापूरसहित राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधून बौद्ध अनुयायी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून दीक्षाभूमी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर सारख्या शहरांमधून या विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
सोलापूर ते नागपूर ही विशेष एक्सप्रेस ट्रेन देखील चालवली जाणार आहे. ही गाडी अहमदनगर मार्गे चालवली जाणार आहे. ही एक एकेरी गाडी राहणार आहे म्हणजेच फक्त सोलापूर ते नागपूर अशी धावणार आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार? या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोलापूर ते नागपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन 11 ऑक्टोबरला चालवली जाणार आहे. या दिवशी ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावरून संध्याकाळी सहा वाजता सोडली जाणार आहे आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी बारा वाजून 45 मिनिटांनी ही गाडी पोहोचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
ही गाडी या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही अहमदनगर बेलापूर कोपरगाव या स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.
ही गाडी या मार्गावरील कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी, अजनी या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.