अहमदनगर ते पुणे प्रवास होणार सुपरफास्ट ! सुरू होणार इंटरसिटी रेल्वेसेवा ? रेल्वेचा ‘हा’ निर्णय ठरणार गेमचेंजर, प्रवाशांना मिळणार दिलासा

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar To Pune Railway

Ahmednagar To Pune Railway : अहमदनगर आणि पुणे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. मात्र असे असले तरी अजूनही अहमदनगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे धावत नाहीये. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

आता मात्र प्रवाशांची ही समस्या दूर होणार अशी शक्यता आहे. खरंतर सोलापूर विभागात असलेले नगर रेल्वे स्टेशन आता पुणे विभागात येणार आहे. याची अंमलबजावणी एक एप्रिल 2024 पासून होणार आहे. म्हणजेच पुणे आणि नगर ही दोन्ही शहरे रेल्वेच्या एकाच विभागात येणार आहेत.

परिणामी आता या दोन्ही शहरादरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी आशा पल्लवीत झाली आहे. यामुळे पुणे ते नगर दरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेणे सोपे होईल अशी आशा काही जाणकार लोकांनी व्यक्त केली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू झाली पाहिजे ही रेल्वे प्रवाशांची मागणी फार जुनी आहे. यासाठी लोकप्रतिनिधींकडे आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडे सातत्याने मागणी करण्यात आली आहे. मात्र अजूनही या मागणीवर सकारात्मक निर्णय झालेला नाही.

परंतु या दोन्ही शहरादरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू होणार असे आश्वासन वारंवार मिळत आले आहे. हे आश्वासन मात्र पूर्ण होत नसल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी नगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सुपूर्त झाला असल्याचे वृत्त देखील प्रसार माध्यमांमध्ये झळकले होते.

तथापि, या संदर्भात पुढे काहीच हालचाल झाली नसून या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून अजूनही निर्णय झालेला नाहीये. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी दौंडमधून पुण्याच्या दिशेने जाताना इंजिन बदलण्याची अडचण येत होती.

मात्र या मार्गावर काष्टीजवळून कॉडलाइन टाकल्याने इंजिन बदलण्याचा प्रश्न सुटला आहे. पण, तरीही इंटरसिटी रेल्वे सुरू होत नाहीये. अशातच आता नगर रेल्वे स्टेशन पुणे विभागात आले आहे.

दौंड, नगर आणि मनमाड मार्गावरील अंकाई स्टेशनपर्यंतचा रेल्वेच्या सोलापूर विभागातला भाग आता पुणे विभागात आला आहे. परिणामी नगर ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे सोयीचे होईल अशी आशा पल्लवीत झाली आहे.

नगर ते पुणे प्रवास होणार सुसाट ! 

रस्ते मार्गाने नगर ते पुणे असा प्रवास करण्यासाठी सध्या स्थितीला चार तासांचा कालावधी लागतोय. मात्र रेल्वेने हा प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होऊ शकतो. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू झाली तर प्रवाशांचा प्रवास जलद होईल अशी आशा आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या संदर्भात नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यासाठी रेल्वे मंत्रालय आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसेच लवकरच ही सेवा सुरू झाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. यामुळे नगर ते पुणे दरम्यान भविष्यात इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू होऊ शकते अशी आशा आता बळावली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe