महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ! अजित पवारांचा 20000 मतांनी पराभव

शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील निकाल लागल्यापासून ईव्हीएम वर शंका उपस्थित केली असून आज तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा 20,000 मतांनी पराभव झाला असल्याचा मोठा दावाच केला आहे. त्यामुळे ईव्हीएमचा हा वाद आणखी पेटणार असे चित्र आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ajit Pawar News

Ajit Pawar News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेत. यामुळे महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून सातत्याने evm वर शंका उपस्थित केली जात आहे.

शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील निकाल लागल्यापासून ईव्हीएम वर शंका उपस्थित केली असून आज तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा 20,000 मतांनी पराभव झाला असल्याचा मोठा दावाच केला आहे.

त्यामुळे ईव्हीएमचा हा वाद आणखी पेटणार असे चित्र आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. या अनुषंगाने आमदार उत्तम जानकर यांनी गोविंद बाग या ठिकाणी जाऊन शरद पवारांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ते म्हणालेत की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत खरेतर अजितदादांचे 12 आमदार, एकनाथ शिंदे यांचे 18, भारतीय जनता पार्टीचे 77 तर 3 अपक्ष असे मिळून त्यांचे 110 आमदार निवडून आले आहेत.

म्हणजे त्यांनी (महायुतीने) दीडशे मतदारसंघात गडबडी केल्या आहेत. बारामती मतदारसंघात अजित पवार यांचा पराभव झाला आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे. बारामती मधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा 20 हजार मतांनी पराभव झाल्याचे मोठे विधान त्यांनी केले आहे.

महायुतीचा जेवढ्या मतदारसंघात विजय झाला आहे, त्याची सखोल माहिती घेतल्यानंतर बारामती मतदारसंघातून अजित पवार हे 20 हजार मतांनी पराभव झाले आहेत. जवळ जवळ अजित पवारांना 1 लाख 80 हजार जी मत पडली आहेत. त्याला दोनास एक असे प्रपोजल लावण्यात आले होते.

त्यामुळे युगेंद्र पवारांची मतं 80 हजार + 60 हजार अशी 1 लाख 40 हजार आहेत आणि अजित पवारांची 60 हजार मते वजा होतात, असं कॅल्क्युलेशन आमदार जानकर यांनी मांडले आहे.

पुढे बोलताना मी अशा प्रकारे सर्व मतदार संघाचा तांत्रिक अभ्यास करत आहे असे त्यांनी म्हटले असून दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुल गांधी आम्ही सगळे मिळून निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत.

त्यांना या सर्व बाबी निदर्शनास आणून देणार आहोत. तसेच व्हीव्हीपॅड मधील चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. सरकारने राजीनामा दिला पाहिजे. ते देत नसतील तर मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेतली पाहिजे.

तसेच चार महिन्यांच्या आत महायुतीचे सरकार जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळेल. त्या दृष्टीने व्यूहरचना आखली आहे असं म्हणतं जानकर यांनी EVM च्या विरोधात आता महाविकास आघाडी एकवटणार असे संकेत दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe