बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर अजित पवार दुःखी ! सत्यजित तांबे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीत काय झाली चर्चा ?

अजित पवारांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामुळे दुःख व्यक्त केल्याची माहिती सुद्धा सत्यजित तांबे यांनी दिली. जे टिंगल करत आहेत ते वरिष्ठांनी केलेलं काम दुर्लक्षित करु शकत नाहीत, असे तांबे यांनी यावेळी म्हटले असून भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या टीकेवर देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चव्हाण यांनी ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला होता ते संपलेत असे म्हटले होते.

Tejas B Shelar
Published:
Ajit Pawar On Balasaheb Thorat

Ajit Pawar On Balasaheb Thorat : विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरात एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात येथून पराभूत झालेत आणि याच पराभवाची गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून बाळासाहेब थोरात मागे होते, अगदी पहिल्या राऊंड पासूनच ते पिछाडीवर होते यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला.

थोरात यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर संगमनेर हा त्यांचा बालेकिल्ला होता. त्यांनी सलग 40 वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र यावेळी विखे पाटील यांची रसद घेऊन शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी या मतदारसंघाचे संपूर्ण गणितच फिरवून टाकले.

अमोल खताळ या नवख्या उमेदवाराने बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याचा पराभव केल्याने सध्या खताळ यांची आणि थोरात यांच्या पराभवाची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.

अशातच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आ. बाळासाहेब थोरात यांचे भाचे आ. सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली आहे. या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर दुःख व्यक्त केल्याचे सत्यजित तांबे म्हणाले आहेत.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सत्यजित तांबे यांनी या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती दिली आहे. आमदार तांबे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलीये. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी तांबे यांनी संगमनेरचा निकाल हा फारच धक्कादायक आहे. 40 वर्ष थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलंय. ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं असेल ते का केलं असेल? असा सवाल देखील सत्यजित तांबे यांनी यावेळी उपस्थित केला.

अजित पवारांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामुळे दुःख व्यक्त केल्याची माहिती सुद्धा सत्यजित तांबे यांनी दिली. जे टिंगल करत आहेत ते वरिष्ठांनी केलेलं काम दुर्लक्षित करु शकत नाहीत, असे तांबे यांनी यावेळी म्हटले असून भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या टीकेवर देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चव्हाण यांनी ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला होता ते संपलेत असे म्हटले होते.

त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचे नावे घेऊनच असे वक्तव्य केले होते. दरम्यान यालाच प्रत्युत्तर देताना सत्यजित तांबे यांनी, खुनशी विचार कुणाच्या मनात असू नयेत. जर अशोक चव्हाण असा विचार करत असतील तर चुकीच आहे. राजकारणी माणूस विसराळू असायला हवा. खुनशी विचार मनात ठेऊन उपयोग नाही असेही सत्यजीत तांबे म्हणालेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe