शेतामध्ये तुषार आणि ठिबक सिंचन करणे होईल सोपे! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे 90% अनुदान, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
micro irrigation scheme

शेतीसाठी पाणी हे एक महत्त्वाची बाब असून पाण्याशिवाय शेती करता येणे शक्यच नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर करून उत्पादन वाढीकडे चालना देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन योजना सुरू करण्यात आलेली आहेत. या योजनेच्या माध्यमातून तुषार आणि ठिबक संच हे अनुदानावर शेतकऱ्यांना मिळतात.

आपल्याला माहित आहे की जर शेतकरी बंधूंना या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर जाऊन त्या ठिकाणी अर्ज करावा लागतो या ठिकाणीच अर्ज स्वीकारण्यात येतात. या योजना खूप महत्वपूर्ण असून याकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देखील या माध्यमातून मिळते.

या योजनांच्या माध्यमातून ठिबक व तुषार सिंचन अनुदानावर मिळवण्याकरिता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सूक्ष्म सिंचन योजनेत चालू वर्षाकरिता ठिबक आणि तुषार संच अनुदानावर दिले जाणार आहेत. याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी शेतकरी प्रणालीवर अर्ज करणे गरजेचे आहे.

 अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुषार ठिबक संच अनुदानावर उपलब्ध केले जात आहेत

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून चालू वर्षाकरिता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुषार व ठिबक संच अनुदानावर उपलब्ध केले जाणार असून या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अर्ज करणे गरजेचे आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 90 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

 कसे आहे या अनुदानाचे स्वरूप?

या योजनांच्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेत 55% व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत 35 टक्के असे 90 टक्के अनुदान मिळते.

तसेच बहु भुधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून 45% व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत 45% असे 90 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा अशी आशयाची माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. तसेच अधिकच्या माहितीसाठी कृषी विभागासाठी संपर्क साधणे आवश्यक आहे.

 या योजनेतून मिळते 80 75 टक्के अनुदान

तसेच ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून( प्रति थेंब अधिक पीक ) 55% व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 25 असे 80 टक्के अनुदान मिळते. त्यासोबतच बहु भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेत 45 व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत 30 असे एकूण 75 टक्के अनुदान मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe