Ahmednagar News : सासूसाठी जेवणाचा डबा आणण्यासाठी गेलेल्या सुनेचा आढळला मृतदेह !

Pragati
Published:

Ahmednagar News : संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी परिसरात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान या मृतदेहाची ओळख पटली असून मृत महिलेचे नाव रंजना भिकाजी खेमनर (वय ३०) असे असून ती संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

सदर महिलेच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या असून कोणीतरी तिचा घातपात केला असल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी दुपारी संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी परिसरात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. नंतर या महिलेची ओळख पटली असून मृत महिलेचे नाव रंजना भिकाजी खेमनर (वय ३०) असे असून ती संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आले आहे.

तसेच सदरची मयत महिला हि आपल्या सासूच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी संगमनेर शहरातील एका रुग्णालयात आली होती. सासूला जेवणाचा डबा आणण्यासाठी सदरची महिला रुग्णालयातून शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता बाहेर गेली होती. मात्र परत आलीच नाही, या दरम्यान तिचा मृतदेह कासारवाडी शिवारात आढळून आला.

सदर महिलेच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या असून घटनास्थळी हातातील बांगड्या आणि रक्तही सांडलेले होते. त्यामुळे हा घातपात असावा, असा संशय नातेवाईकांनी केला. या मृत महिलेचा मृतदेह उत्तररीय तपासणीसाठी लोणीच्या प्रवरा हॉस्पिटल येथे नेण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe