Akshay Tritiya 2025 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात साडेतीन मुहूर्तापैकी एक अर्थातच गुढीपाडव्याचा सण साजरा झालाय. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात अगदीच आनंदात अन उत्साहात साजरा झाला. आता लवकरच देशात आणखी एक मोठा सण साजरा होणार आहे येत्या काही दिवसांनी देशात अक्षयतृतीयाचा मोठा सण सेलिब्रेट होणार आहे.
अक्षय तृतीया चा सण आपल्या राज्यात सर्वत्र साजरा होतो. खान्देशात म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये याला आखाजी या नावाने ओळखतात. या दिवशी खानदेशात पुरणपोळी आणि आमरस बनवला जातो.

या शुभ दिवशी अनेक नवीन कार्याची सुरुवात केली जाते. सोन आणि चांदी खरेदी करण्यासाठी देखील हा दिवस फारच शुभ समजला जातो. अनेक जण या दिवशी नवीन व्यवसायाची सुद्धा सुरुवात करतात. दरम्यान आज आपण या दिवशी कोणत्या पाच गोष्टी आवर्जून खरेदीकरायला हव्यात याविषयी माहिती पाहणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला ज्या पाच गोष्टींची माहिती देणार आहोत त्या गोष्टी कोणीही अगदी सहज खरेदी करू शकणार आहेत. अवघ्या 50 ते 100 रुपयांच्या या वस्तूंमुळे तुमच्या आयुष्यात अनेक मोठे सकारात्मक बदल तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत.
अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी केली पाहिजे
शास्त्रानुसार, वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजेच अक्षय्य तृतीया यंदा 30 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते. मंगल कार्याची सुरुवात याच दिवशी करायला हवी.
विवाह, गृहप्रवेश, व्यवसायाची सुरुवात यांसारख्या मंगल कार्यांसाठी अक्षय्य तृतीयाचा दिवस सर्वात जास्त लाभ देणारा दिवस म्हणून ओळखला जातो. याशिवाय, या दिवशी अनेकजण नवीन वाहन सोने-चांदी अशा मौल्यवान वस्तूंची सुद्धा खरेदी करतात.
या दिवशी नवीन वाहन खरेदी करणे किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. पण ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, ज्यांना महागड्या वस्तू खरेदी करता येणे शक्य नाही अशा लोकांनी काय करायचे ? म्हणूनच आज आपण शास्त्रात सांगितलेल्या अशा 5 वस्तू सांगणार आहोत ज्यामुळे अशा सामान्य लोकांनाही अक्षय तृतीयेचा सण लाभप्रद ठरणार आहे.
परंपरेनुसार अन शास्त्रानुसार या दिवशी सोनं-चांदी खरेदी केली जाते, मात्र ही खरेदी प्रत्येकाला परवडणारी नसते. पण ज्योतिषशास्त्रात या दिवशी फक्त सोने आणि चांदी खरेदी करावे असे काही लिहिलेले नाही. शास्त्रानुसार जर विचार केला तर या दिवशी काही स्वस्त आणि शुभ वस्तू खरेदी केल्यासही घरात सुख-समृद्धी येते.
शास्त्र असे सांगते की, अक्षय तृतीयाच्या दिवशी कापूस खरेदी करायला हवी. कापूस हे शांततेचे आणि संपत्ती वाढविणारे प्रतीक मानले जाते. यामुळे तुम्हीही या अक्षय तृतीयाला कापसाची खरेदी अवश्य करा. तुम्हाला हवा तेवढा कापूस तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता.
याशिवाय सैंधव मीठ (रॉक मीठ) या दिवशी खरेदी करायला हवे असे शास्त्रात नमूद आहे. जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी हे मीठ खरेदी केले तर तुमच्या कुंडलीतील शुक्र आणि चंद्र ग्रह अधिक पावरफुल बनतात आणि तुमच्या आयुष्यावर याचा सकारात्मक प्रभाव पडतो.
मात्र, हे मीठ त्या दिवशी चुकूनही खाऊ नये असे केल्यास तुमच्या आयुष्यात काही निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा पाहायला मिळू शकतो. दुसरीकडे पितळी वा तांब्याची भांडी देखील अक्षय्य तृतीयेला खरेदी करण्याची रीत आहे अन शास्त्रात असा उल्लेख आहे की पितळाची किंवा तांब्याची भांडी या दिवशी खरेदी केल्यास अन्नधान्याची भरभराट होते.
याशिवाय तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कवड्या खरेदी करून माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. असे केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर विशेष प्रसन्न होईल आणि तुमची आर्थिक अडचण कायमची दूर होईल.