मित्रांसोबत बसण्याचा प्लॅन आहे का ? मग दारू प्यायल्यानंतर किती दिवस शरीरात अल्कोहोल राहते ? वाचा….

दारू पिल्यानंतर शरीरात किती दिवस अल्कोहोल असू शकतो? दारूच्या विविध प्रकारानुसार त्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती असते? याबाबत तुम्हाला माहिती आहे का. नाही ना मग आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Updated on -

Alcohol Fact : तुम्ही तुमच्या मित्रांसमवेत सॅटर्डे नाईट एन्जॉय करण्याचा प्लॅन करत आहात का? मग आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे. खरतर आठवड्याभराचा थकवा दूर करण्यासाठी अनेकजण सॅटर्डे नाईटला बसतात. तळीरामांसाठी तर प्रत्येकच दिवस Saturday नाईट असतो. संध्याकाळ झाली की अनेकांना दारूची आठवण येते.

मग कामावरून परतत असताना आपसूक अशा तळीरामांचे पाय वाईन शॉपकडे वळतात. घरी जाताना किमान 2 पेग तरी मारू असा विचार त्यांच्या डोक्यात असतो, मग काय 2 पेग घेण्याचा प्लॅन थेट कॉटरपर्यंत जातो. वास्तविक दारू पिणे शरीरासाठी फारच हानिकारक आहे.

पण तरीही अनेकजण दारूचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. दारूच्या सेवनाने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. मात्र तरीही दारूचे व्यसन काही सूटत नाही. दारू पिल्याने शरीरावर अनेक अपायकारक परिणाम होत असतात. यामुळे शरीराची राख रांगोळी होते शिवाय दारू पिऊन जर गाडी ड्राईव्ह केली तर अपघात होण्याची शक्यता अधिक असते.

असे असतानाही तुम्हाला सायंकाळी नेहमीच वाईन शॉप च्या बाहेर मोठी गर्दी दिसेल. दरम्यान आज आपण दारूच्या बाबतीतले काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेणार आहोत. दारू प्यायल्यानंतर शरीरात अल्कोहोल किती दिवस राहू शकतो? याच बाबतची माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

दारू प्यायल्यावर शरीरात किती दिवस अल्कोहोल राहतो?

दारू प्यायल्यावर शरीरात किती दिवस अल्कोहोल राहतो अनेकांचा प्रश्न आहे. दरम्यान याबाबत जाणकार लोक सांगतात की, दारूचे शरीरावर होणारे परिणाम हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या मेटाबॉलिझमवर अवलंबून असतात. असं म्हणतात की, सामान्यतः एकावेळी प्यायलेली दारू तासाभरात 50% कमी होते.

म्हणजे शरीर तासाभरात 50 टक्के दारू पचवते. उदाहरणार्थ, जर समजा कोणी 80 मि.ली. दारू घेतली आणि पिणे थांबवले, तर दोन तासांनी फक्त 50 मि.ली. दारू शरीरात शिल्लक राहत असते. आता मानवी शरीरात दारूचे प्रमाण किती आहे हे श्वासातल्या गंधावरून समजते.

यासाठी ब्रेदालायझर यंत्र वापरले जाते जे की रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजते. अल्कोहोलचे प्रमाण बीएसी या एककात मोजले जाते. तज्ञ लोकांनी म्हटल्याप्रमाणे जर समजा BAC 0.08 असेल, तर वाहन चालवणे फारच चुकीचे आहे कारण की अशा परिस्थितीत वाहन चालवताना नियंत्रण सुटणे, वेगावर ताबा न राहणे अशा गोष्टी सर्वाधिक पाहायला मिळतात.

त्यामुळे या अवस्थेत वाहन चालवू नये, यामुळे अपघात होण्याची शक्यता असते शिवाय अशा स्थितीत वाहन चालवताना आढळल्यास वाहन चालकावर गुन्हा सुद्धा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे. खरेतर, ज्या लोकांचे वजन सुमारे 72 किलो इतके असेल तर अशा व्यक्तींनी चार पेग दारू घेतल्यास BAC धोकादायक पातळीवर पोहचते.

आता दारू प्यायल्यावर किती दिवस शरीरात राहते याबाबत बोलायचे झाले तर दारू घेतल्यानंतर 10-12 तास ती आपल्या रक्तात असू शकते. मात्र केस तपासणी केली तर जवळपास 90 दिवसांपर्यंत दारूचे अंश आपल्याला शरीरात दिसून येऊ शकतात.

म्हणजेच दारू प्यायल्यावर जवळपास तीन महिन्यांपर्यंत दारूचे अंश आपल्या शरीरात असतात. मात्र दारूचा नशा हा काही तासांपुरताच असतो. आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या दारूमध्ये किती टक्के अल्कोहोल असते याची माहिती जाणून घेऊयात.

दारूचा प्रकार आणि त्यामधील अल्कोहोलचे प्रमाण

मिळालेल्या माहितीनुसार दारूच्या विविध प्रकारांत अल्कोहोलचे प्रमाण सुद्धा वेगवेगळे असते. जसे की, व्होडकामध्ये अल्कोहोलचे प्रमाण जवळपास 40-95% असते. जिन, रम आणि व्हिस्कीमध्ये जवळपास 36-50%, टकिलामध्ये जवळपास 50 ते 51 टक्के, लिकरमध्ये 15 टक्के, फोर्टिफाईड वाईन मध्ये 16 ते 24 टक्के आणि बियर मध्ये चार ते आठ टक्के एवढे अल्कोहोलचे प्रमाण असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News