घरात दारूच्या किती बाटल्या ठेवता येतात ? महाराष्ट्रातील कायदा काय सांगतो

कामाचा स्ट्रेस दूर करण्यासाठी आणि एन्जॉय म्हणून पार्टी करताना अनेकजण दारूचे सेवन करतात. पण भारतात एक व्यक्ती आपल्या घरात किती दारू स्टोर करू शकतो? याचे नियम काय आहेत याविषयी तुम्हाला माहिती आहे का. नाही ना मग आज आपण राज्यानुसार भारतात याबाबतचे नियम नेमके कसे आहेत? याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Alcohol Rule : दारूचे व्यसन किती वाईट आहे, यामुळे काय होऊ शकतं, हे प्रत्येकालाच माहिती आहे. मात्र तरीही अनेकांना दारूचे व्यसन आहेच. अनेक जण दररोज दारूचे सेवन करतात. दरम्यान अशाच तळीरामांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर दारू पिणे हे शरीरासाठी तर अपायकारक आहेच शिवाय यामुळे घरातील इतर सदस्यांचे मानसिक स्वास्थ्य सुद्धा खराब होऊ शकते.

घरात नेहमी भांडणाची परिस्थिती उद्भवू शकते आणि यामुळे संसाराची राख रांगोळी होण्यास वेळ लागणार नाही. यामुळे दारूचे सेवन करताना तळीरामांनी या सुद्धा गोष्टीचे भान ठेवायला हवे. मात्र जे लोक एन्जॉय म्हणून दारूचे सेवन करतात अन घरीच दारू स्टोर करतात त्यांच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. तसेच अनेक जण पार्टीसाठी घरीच दारूच्या बाटल्या आणतात.

पण तुम्हाला सर्वसामान्य नागरिक आपल्या घरात किती दारूच्या बातम्या स्टोअर करू शकतात? याबाबत सरकारने काय नियम तयार केले आहे याविषयी माहिती आहे का? नाही ना मग आज आपण राज्यानुसार सर्वसामान्य नागरिक आपल्या घरात किती दारूच्या बाटल्या ठेवू शकतात ? याबाबतचे नियम अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरेतर, भारतातील काही राज्यांमध्ये घरात किती दारूच्या बाटल्या ठेवल्या जाऊ शकतात याबाबत नियम तयार करण्यात आले आहेत तर काही राज्यांमध्ये दारू सेवनासाठी तसेच ठराविक लिमिटनुसार त्याच्या वाहतुकीसाठी लायसन्स अनिवार्य करण्यात आलेले आहे. जाणकार लोक सांगतात की, दारू खरेदी, वाहतूक आणि बाळगण्याचे काही विशिष्ट नियम आहेत.

खरेतर, जेव्हा मित्र घरी येतात किंवा घरी पार्टीचे आयोजन केले जाते तेव्हा घरात किती दारूच्या बाटल्या ठेवता येऊ शकतात, याची लिमिट काय आहे? असा प्रश्न उद्भवतो. वास्तविक, घरी दारू पिणे कायद्याने चुकीचे नाही पण एका मर्यादेपेक्षा जास्त दारू घरी ठेवणे महागात पडू शकते. म्हणून कायदेशीर अडचणीशिवाय तुम्ही घरी दारूच्या किती बाटल्या ठेवू शकता? याबाबतचे राज्यानुसारचे नियम आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

काय आहेत नियम?

महाराष्ट्र : सर्वप्रथम आपण आपल्या राज्याबाबत बोलूयात. खरेतर, भारतातील विविध राज्यांमध्ये दारू साठवण्यासाठी आणि खरेदीसाठी वेगवेगळे कायदे आणि मर्यादा लावुन देण्यात आल्या आहेत. आपल्या राज्य बाबत बोलायचं झालं तर राज्यात दारू पिण्यासाठी परवाना बंधनकारक असल्याचे नियम आहेत. आपल्या राज्यात दारू पिण्यासाठी सुद्धा परवाना लागतो. राज्यातील 18 वर्षावरील नागरिकांना परवाना असल्यासच स्थानिक व विदेशी दारूची खरेदी, वाहतूक व दारूचे सेवन करता येते.

दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली बाबत बोलायचं झालं तर येथे एक व्यक्ती आपल्या घरात 18 लिटरपर्यंत दारू ठेवू शकतो. मात्र रम, व्हिस्की, जिन अशा प्रकारच्या दारूसाठी फक्त 9 लिटरपर्यंतच मर्यादा आहे. तसेच दिल्लीबाहेर जर दिल्ली मधून दारू घेऊन जायची असेल तर फक्त 1 लिटर दारू नेता येते.

राजस्थान : राजस्थान मधील नागरिकांना बारा बाटली किंवा नऊ लिटर भारत निर्मित विदेशी दारू ठेवण्याचा अधिकार आहे. यापेक्षा अधिक दारू आढळून आल्यास कायदेशीर कारवाई निश्चित आहे.

हरियाणा : हरियाणामध्ये स्थानिक दारूच्या 750 मिलीच्या सहा बाटल्या, 18 विदेशी बाटल्या पण आयात केलेल्या बाटल्या फक्त सहा आणि त्यांचेही प्रमाण 750ml प्रति बॉटल इतकेच असणे आवश्यक आहे. 650 मिलीच्या 12 बीयरच्या बाटल्या, 750 मिलीच्या 6 रमच्या बाटल्या, 750 मिलीच्या वोडकासारख्या सहा बाटल्या, तसेच बारा वाईन बॉटल साठवता येऊ शकतात.

पंजाब : पंजाब मधील नागरिकांना भारतात तयार झालेल्या दोन विदेशी दारूच्या बाटल्या, प्रति बॉटल 650 मिली क्षमता असणारे 1 बीयर केस व 2 विदेशी बाटल्या (ज्याची क्षमता एक किंवा पाच लिटरची असू शकते) ठेवण्याची परवानगी आहे.

उत्तर प्रदेश : यूपी मधील नागरिकांसाठी तेथील सरकारने 1.5 लिटर विदेशी दारू व 6 लिटर बीयर ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. वाईनसाठीची मर्यादा दोन लिटर इतकी आहे.

केरळ : या राज्यांमधील नागरिकांना सरकारकडून 3 लिटर विदेशी दारू व 6 लिटर बीयर ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण विदेशी दारू म्हणजे फक्त भारतात तयार झालेली विदेशी ब्रँडची दारू आयात केलेली विदेशी दारू नाही.

मध्य प्रदेश : मध्यप्रदेश मधील नियमानुसार कोणीही व्यक्ती एक ठराविक शुल्क देऊन शंभर महागड्या दारूच्या बाटल्या आपल्या घरात ठेवू शकतो.

हिमाचल प्रदेश : या राज्यांमधील नागरिकांना बियरच्या जास्तीत जास्त 48 बाटल्या आणि विस्की च्या 36 बाटल्या घरात ठेवण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

गोवा : जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात नागरिकांना भारतात तयार झालेल्या बारा बाटल्या विदेशी दारूच्या, 24 बाटल्या बियरच्या, 18 बाटल्या स्थानिक दारूच्या आणि रेक्टिफाइड तसेच डिनेचर्ड स्पिरिटच्या सहा-सहा बाटल्या ठेवण्याची अनुमती आहे.

आसाम : आसाम मधील सरकारने नागरिकांना IMFL म्हणजेच भारतात निर्मित झालेली विदेशी दारूच्या 12 बाटल्या, 4.5 लिटर सुधारित किंवा विकृत स्पिरीट आणि 3 बाटल्या (प्रत्येक 750 मिली) स्थानिक ब्रँडच्या ठेवण्यास परवानगी दिलेली आहे.

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील 21 वर्षांवरील नागरिकांना लायसन्स घेऊन भारतात निर्मित विदेशी दारूच्या 6 बाटल्या ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय या लोकांना विना लायसन्स 18 बियर च्या बाटल्या ठेवता येऊ शकतात.

अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेश मध्ये विना लायसन्स 18 लिटर पेक्षा अधिक भारत निर्मित विदेशी दारू किंवा देशी दारू ठेवणे कायद्याने अवैध आहे.

आंध्र प्रदेश : विना लायसन्स आंध्र प्रदेश मधील नागरिकांना भारत निर्मित विदेशी दारूच्या तीन बाटल्या आणि बियरच्या सहा बाटल्या ठेवण्याची परवानगी आहे.

या राज्यांमध्ये घरात दारू ठेवता येत नाही

भारतातील काही राज्यांमध्ये दारूबंदीचा निर्णय झालेला आहे. यामध्ये बिहार राज्याचा सुद्धा समावेश होतो. बिहार, मिझोराम, नागालँड, लक्षद्वीप, गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये दारूबंदीचा निर्णय झालेला आहे म्हणजेच ड्राय स्टेट आहेत आणि इथे दारू पिणे, बाळगणे विक्री करणे सार काही कायद्याने बंद आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News