सर्व हिमनद्या झाल्या गायब

Published on -

Marathi News : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला हा देश सर्व हिमनद्या गमावणारा आधुनिक इतिहासातील पहिला देश ठरला आहे. व्हेनेझुएलात उरलेला शेवटचा ग्लेशियरही ग्लोबल वार्मिंगच्या प्रभावाहीनमुळे गायब झाला असून,

या ग्लेशियरचा भागही एवढा कमी झाला आहे की, हवामान शास्त्रज्ञांनी त्याचे वर्गीकरण केवळ बर्फ क्षेत्र म्हणून केले आहे.

व्हेनेझुएला हा आधुनिक काळातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला आणि एकमेव देश असल्याचे मानले जाते. इंटरनॅशनल क्रायोस्फिअर क्लायमेट इनिशिएटिव्ह (आयसीसीआय) ने दिलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएलाची एकमेव उरलेली हिमनदी हम्बोल्ट किंवा ला कोरोना लक्षणीयरीत्या संकुचित झाली आहे. अशा स्थितीत आता हिमनद्यांऐवजी बर्फाचे क्षेत्र असे वर्गीकरण करण्यात आले असून, व्हेनेझुएलानंतर इंडोनेशिया, मेक्सिको आणि स्लोव्हेनिया हिमनद्यामुक्त होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञ वर्तवत आहेत. एका वृत्तानुसार व्हेनेझुएलाने गेल्या शतकात किमान सहा हिमनद्या गमावल्या आहेत. हवामान बदलामुळे जागतिक सरासरी तापमानात वाढ होत असल्याने हिमनद्यांचे बर्फ वितळत आहे, त्यामुळे जगभरात समुद्राची पातळीही वाढत आहे.

डरहम युनिव्हर्सिटीच्या ग्लेशियोलॉजिस्ट कॅरोलिन क्लासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएलाच्या शेवटच्या हिमनदीवर २००० पासून फारसा बर्फ नाही. तर यावर्षी मार्चमध्ये, कोलंबियातील लॉस अँडीज विद्यापीठातील संशोधकांना असे आढळून आले की, हिमनदी ४५० हेक्टरवरून केवळ दोन हेक्टरपर्यंत संकुचित झाली आहे. तथापि, हिमनग म्हणून पात्र होण्यासाठी बर्फाच्या तुक ड्याच्या किमान आकाराचे कोणतेही जागतिक मानक नाही. परंतु, यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या म्हणण्यानुसार, साधारणपणे स्वीकारलेली मार्गदर्शक तत्त्वे सुमारे १० हेक्टर आहेत. तथापि, २०१८ मध्ये नासाने ते व्हेनेझुएलाचे शेवटचे ग्लेशियर मानले असून, ग्लेशियर वाचविण्याचे व्हेनेझुएला सरकारचे प्रयत्नही फोल ठरत आहेत.

आयसीसीआय आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंटचे ग्लेशियोलॉजिस्ट जेम्स किरखम आणि मिरियम जॅक्सन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सामान्य व्याख्या म्हणून ग्लेशियोलॉजिस्ट सहसा ०.१ चौरस किमी म्हणजेच १० हेक्टर बेंचमार्क म्हणून वापरतात. त्याचप्रमाणे अलीकडच्या काही वर्षांत हम्बोल्ट ग्लेशियरमध्ये प्रवेश करण्यात समस्या जाणवू लागल्या असून, त्यामुळे मोजमाप प्रकाशित होण्यास विलंब झाला असावा.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये व्हेनेझुएलाच्या सरकारने उरलेल्या बर्फाला थर्मल ब्लॅकेटने झाकण्याचा प्रकल्प सुरू केला. त्यामुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया थांबेल, अशी आशा सरकारने व्यक्त केली होती. मात्र, या निर्णयावर स्थानिक हवामान शास्त्रज्ञांनी टीका केली, तसेच प्लास्टिकच्या कणांनी जवळपासच्या वस्त्या दूषित होऊ शकतात, असा धोकाही व्यक्त होत आहे.

पर्वतीय हिमनद्यांना उन्हाळ्यात सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आणि त्यांच्या सभोवतालची हवा थंड ठेवण्यासाठी पुरेसा बर्फ आवश्यक आहे. एकदा हिमनदी निघून गेल्यावर, सूर्यप्रकाश जमिनीला गरम करतो, ज्यामुळे ते अधिक गरम होते आणि उन्हाळ्यात बर्फ तयार होण्याची शक्यता कमी होते. नवीन अंदाजानुसार २१०० पर्यंत जागतिक स्तरावर २० ते ८० टक्के हिमनद्या नष्ट होतील. सीओर उत्सर्जन वेगाने कमी करून हे नुकसान कमी केले जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe