पुढील चार वर्षात 10 लाख लोकांना मिळणार जॉब ! जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीची भारतात 3,15,00,00,000 रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक

Amazon Investment Plan : गेल्या काही वर्षांमध्ये देशात बेरोजगारीचे सावट एवढे विशाल बनले आहे की या सावटाखाली अनेकजण दाबले गेले आहेत. बेरोजगारीमुळे देशात गरिबी, कुपोषण, भूखमरी अशा गोष्टी सातत्याने समोर येत आहेत.

खरे तर भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे मात्र तरीही देशातील बेरोजगारीचा दर हा चिंतेचा विषय आहे. विशेष म्हणजे वाढती बेरोजगारी श्रीमंत आणि गरिबी मध्ये असणारी दरी आणखी रुंदावत आहे.

बेरोजगारीमुळे संपत्तीचे असमान वितरण यापुढे सुद्धा वाढत राहणार आहे. मात्र आता बेरोजगारीने त्रस्त नवयुवक तरुणांसाठी एक आशादायक बातमी समोर आली आहे. येत्या चार वर्षात भारतात दहा लाख नवीन जॉब तयार होणार असून याची घोषणा जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीने अर्थात अमेझॉनने केली आहे.

अमेझॉन भारतात आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सध्या स्थितीला अमेझॉनची भारतात 40 बिलियन डॉलरची गुंतवणूक आहे मात्र आता येत्या चार वर्षांमध्ये अमेझॉन जवळपास एवढीच गुंतवणूक करणार आहे.

अमेझॉन ची एन्ट्री 2010 मध्ये झाली आणि तेव्हापासून त्यांनी आत्तापर्यंत म्हणजेच मागील पंधरा वर्षांच्या काळात 40 बिलीयन डॉलरची गुंतवणूक केली. मात्र आता पुढील चार वर्षात अमेझॉन या गुंतवणुकी व्यतिरिक्त 35 बिलियन म्हणजेच अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

मायक्रोसॉफ्ट ने भारतात 1.5 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर अमेझॉनने ही मोठी घोषणा केली आहे. यावरून भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी पुढील काही वर्ष विशेष सकारात्मक आहेत आणि लॉन्ग टर्ममध्ये देशाचा चांगला विकास होणार असे संकेत मिळत आहे.

ग्लोबल आयटी कंपन्यांना भारतात चांगली दीर्घकालीनक्षमता दिसून येत आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच आश्वासन कंपन्यांकडून दिले जात आहे. अमेझॉनच्या 35 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीमुळे पुढील चार वर्षात देशात जवळपास दहा लाख नवीन जॉब तयार होणार आहेत.

स्वतः अमेझॉन कंपनीकडून हा दावा करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील संभावना शिखर परिषदेत अमेझॉनने 2030 पर्यंत कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करणार अशी घोषणा केली.

पुढील काही वर्षांत भारतात 35 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा कपंनीचा मानस आहे. तसेच 2030 पर्यंत, कंपनी 10 लाखाहून अधिक रोजगार निर्माण करणार आहे. येत्या काही वर्षात अमेझॉन कंपनीकडून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, प्रेरित आणि हंगामी नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत.

अमेझॉनने त्यांच्या नवीनतम ब्लॉग पोस्टमध्ये या आपल्या नव्या योजनेची माहिती दिली आहे. खरे तर अमेझॉनने गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावर त्यांचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात कमी केले आहे.

अमेझॉनने अनेकांना नोकरीवरून काढून टाकले आहे मात्र भारतात पुढील चार-पाच वर्षांच्या काळात कंपनी तब्बल दहा लाख नवीन रोजगार तयार करणार असे आश्वासन देत आहे.

यामुळे आता अमेझॉन कंपनीचे हे आश्वासन कितपत सत्यात उतरते आणि येत्या काळात खरंच दहा लाख नवीन रोजगारांची निर्मिती होते का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.