Amrut Bharat Train : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रवाशांना लवकरच आणखी एक नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. भारतीय रेल्वेनं अमृत भारत एक्सप्रेस सुरु केली आहे.
या गाडीला नॉन एसी वंदे भारत म्हणून ओळखतात. याच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाने देशभरात प्रवासाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. ही नॉन-एसी सुपरफास्ट ट्रेन सर्वसामान्य गरीब जनतेला वंदे भारत एक्सप्रेस सारख्या सुविधा देते.

स्वस्त, जलद आणि आरामदायी प्रवासाच्या पर्यायामुळे ही गाडी कमी दिवसात हिट ठरली आहे. आपल्या राज्याला आत्तापर्यंत या प्रकाराच्या दोन गाड्या मिळाल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई इथून बिहारमधील सहरसापर्यंत एक गाडी सुरू करण्यात आली आहे.
तसेच जोगबनी (बिहार) – ईरोड (तामिळनाडू) अशी सुद्धा या गाडीची सेवा सुरू झाली आहे. दरम्यान आता राज्याला तिसऱ्या नव्या अमृत भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. उधना – ब्रह्मपुर दरम्यान नवीन ट्रेन सुरू होणार आहे.
राज्यातील तब्बल 14 महत्त्वाच्या स्थानकावर नवीन एक्सप्रेस थांबा घेईल. ही गाडी गुजरात, ओडिशा व महाराष्ट्रासाठी महत्त्वाची राहील. विशेष म्हणजे ही गाडी येत्या दोन दिवसांनी सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
27 सप्टेंबरला या गाडीचे लोकार्पण होईल. स्वतः नरेंद्र मोदी गाडीला हिरवा झेंडा दाखवतील व याचे उद्घाटन करतील. या गाडीला 22 डब्बे आहेत. 27 सप्टेंबरला सुरू करण्यात येणारी अमृत भारत ट्रेन उधनातून दर रविवारी सकाळी 7:10 वाजता सोडली जाणार आहे.
ब्रह्मपुरी येथून ही गाडी दर सोमवारी रात्री 23:45 वाजता सोडली जाणार आहे. ही एक साप्ताहिक गाडी राहणार असून यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या स्थानकावर थांबणार
नवापूर
नंदुरबार
दोंडाईचा
शिंदखेडा
अमळनेर
धरणगाव
जळगाव
भुसावळ
मलकापूर
अकोला
बडनेरा
वर्धा
नागपूर
गोंदिया