Anant Chaturdashi 2021 : श्रीगणेशाचा आशीर्वाद राहील कायम फक्त हा मंत्र लक्षात ठेवा

Published on -
वाचकहो  दहा दिवसांच्या मुक्कामनंतर बाप्पाला निरोप देण्याची आज वेळ आलीय. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. 

बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मोठ्या भक्तीभावाने हा सोहळा पार पाडला जातो.

आज गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी गणपती प्रतिमेच्या संकल्प मंत्रानंतर पूजा- आरती करा. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर कंकू वाहा.

गणपती बाप्पासाठी मंत्र बोलताना 21 दूर्वा अर्पण करा. बाप्पाला 21 लाडू अर्पण करा.

विसर्जन करताना काही मंत्रांचा जप केल्याने बाप्पाची विशेष कृपा आपल्यावर कायम राहते.

– ॐ गणाधिपाय नम:
– ॐ उमापुत्राय नम:
– ॐ विघ्ननाशनाय नम:
– ॐ विनायकाय नम:
– ॐ ईशपुत्राय नम:
– ॐ सर्वसिद्धप्रदाय नम:
– ॐ एकदन्ताय नम:
– ॐ इभवक्त्राय नम:
– ॐ मूषकवाहनाय नम:
– ॐ कुमारगुरवे नम:

यानंतर श्री गणेश मूर्ती घरातून विसर्जनासाठी घेऊन जाताना आरती करा आणि विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्याठिकाणी परत एकदा आरती करा. गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करताना या मंत्राचा जप करा

यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्.
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च ॥

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News