मोठी बातमी ! राजधानी मुंबईनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरातही सुरू होणार एप्पलचे स्टोर, कुठे सुरु होणार स्टोर?

भारतातील आणखी एका नव्या शहराला ॲपलचे स्टोअर मिळणार आहे. दिल्ली आणि राजधानी मुंबईनंतर आता देशातील एका महत्त्वाच्या शहरात एप्पलचे तिसऱ्या स्टोअर ओपन होणार असून महाराष्ट्राला सुद्धा लवकरच अॅपलचे दुसरे स्टोअर मिळणार आहे.

Published on -

Apple New Store : जगातील प्रसिद्ध टेक जायंट कंपनी Apple लवकरच एक नवीन स्टोर ओपन करणार आहे. खरेतर, नुकत्याच काही महिन्यापूर्वी अँपलने राजधानी मुंबईत स्टोर ओपन केले होते. या आधी दिल्लीत स्टोर ओपन करण्यात आले होते. यानंतर आता देशात तिसरे स्टोर ओपन होणार असे वृत्त समोर आले आहे.

ॲपल कडून सध्या भारतात आपल्या व्यवसायाचा जोरदार विस्तार सुरू आहे. यावर अमेरिकेने नाराजी सुद्धा व्यक्त केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सार्वजनिक मंचावरून एप्पलच्या भारतातील व्यवसायाविरोधात नाराजी व्यक्त केली. पण एप्पल मात्र भारतात आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपल कंपनीला “अमेरिकेत आयफोनचं उत्पादन केलं नाही तर 25% कर आकारला जाईल,” असा इशारा दिला होता. पण तरीही कंपनीने भारतात आपल्या व्यवसाय विस्ताराला गती देण्याचे ठरवले आहे. यासाठी दिल्ली आणि मुंबई नंतर आता देशात तिसरं रिटेल स्टोर सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

यामुळे टिम कूक यांच्या नेतृत्वातील Apple चा हा निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला असून यामुळे भारतात आगामी काळात आणखी काही नव्या रोजगारांची निर्मिती होऊ शकणार आहे. तसेच या निर्णयामुळे भारतीयांना स्वस्तात आयफोन मिळत राहतील. 

कुठे सुरू होणार तिसर स्टोअर 

दिल्लीत आणि मुंबईत एप्पलने स्टोअर सुरू केले. Apple ने मुंबईच्या BKC मध्ये आणि दिल्लीच्या Saket येथे आपली स्टोअर्स सुरू केली आहेत. मुंबईतील स्टोर हे महाराष्ट्रातील पहिलेच स्टोर आहे. दरम्यान आता एप्पलचे तिसरे स्टोर बंगळुरूच्या Phoenix Mall of Asia, Hebbal येथे सुरू होणार अशी बातमी समोर आली आहे.

हेब्बल येथील नवीन स्टोअरचं आकारमान दिल्लीतील Select Citywalk स्टोअरच्या बरोबरीचं राहणार आहे. पण आपल्या मुंबईच्या Jio World Drive पेक्षा हे स्टोर लहान राहणार आहे. म्हणजेच मुंबईतील एप्पल चे स्टोर हे ॲपलचे तिसऱ्या स्टोअर सुरू झाल्यानंतरही देशातील सर्वात मोठे स्टोर राहणार आहे.

दरम्यान, ॲपलच्या तिसऱ्या स्टोर बाबत बोलायचं झालं तर या स्टोअरचा वार्षिक भाडेपट्टा 2.09 कोटी रुपये इतका राहणार आहे, तर कंपनीने यासाठी 1.046 कोटी रुपये डिपॉझिट सुद्धा दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या स्टोअरच्या भाड्यात दर तीन वर्षांनी 15% वाढ होणार आहे. याशिवाय, कंपनी रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलनुसार पहिल्या तीन वर्षांत 2% आणि नंतर 2.5% उत्पन्न शेअर करणार असेही बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील या शहरालाही मिळणार एप्पलचे स्टोर 

जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, Apple सध्या पुणे, दिल्ली एनसीआर आणि मुंबईतील नव्या लोकेशन्ससाठीही विचार करत आहे. म्हणजेच भविष्यात आपल्या पुण्यातही ॲपलचे स्टोअर उघडू शकते.

अँपलने स्वतः भारत आता केवळ एक विक्री बाजार नसून, एक महत्त्वाचं उत्पादन केंद्रही बनत आहे, असं अलीकडेच स्पष्ट केल आहे. आता जून 2025 पासून बहुतेक आयफोनवर ‘Made in India’ टॅग असणार अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News