सापांची भिती वाटते ? घराजवळ ‘हे’ एक झाड लावा, विषारी साप घराच्या आजूबाजूलाही दिसणार नाही ! स्वतः जंगलातील आदिवासी लोकांनीचं दिली माहिती

Published on -

Snake Viral News : गाव खेड्यांमध्ये आणि जंगलांचा आजूबाजूला राहणाऱ्या वस्त्यांवर पावसाळ्याच्या काळात तसेच हिवाळ्याच्या काळात साप निघण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात साप मानवी वस्त्यात शिरण्याची भीती असते. खरे तर सापाचं नुसतं नावही ऐकलं तरीही भीतीने अंग कापते. जर समजा घराच्या आजूबाजूला किंवा घरात साथ निघाला मग तर विचारूच नका. कारण म्हणजे सापांच्या बाबतीत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज तयार झालेले आहेत. साप चावला की थेट मृत्यू अशीच लोकांची धारणा आहे. मात्र खरं पाहता सर्वच साप विषारी नसतात त्यामुळे कोणत्याही सापांच्या चाव्यामुळे माणूस मरत नाही.

विषारी सापांच्या चाव्यामुळे माणसाच्या मृत्यूची शक्यता अधिक असते पण वेळेत इलाज झाला तर विषारी सापाच्या चाव्यातून देखील माणसं वाचतात. आपल्या देशात सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. देशात सापाच्या शेकडो प्रजाती आहेत मात्र यातील काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी आहेत. कोब्रा मण्यार फुरसे आणि घोणस या आपल्याकडे आढळणाऱ्या सर्वाधिक विषारी सापांच्या जाती आहेत. इतर जाती मात्र बिनविषारी आहेत. मात्र असे असले तरी देशात दरवर्षी सर्पदंशामुळे 56 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याचा दावा केला जातोय. यामुळे, सापांची प्रत्येकालाच भीती वाटते. दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल आणि तुम्हाला तुमच्या घराच्या शेजारी किंवा घरात साप घुसू नये असे वाटत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास टीप घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला जी टीप देणार आहोत ती टीप स्वतः आदिवासी लोकांनी सांगितलेली आहे.

ही वनस्पती घराशेजारी लावल्यास साप लांब पळतात

सापाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी आदिवासी समुदाय आपल्या घराच्या परिसरामध्ये काही खास प्रकारच्या वनस्पती लावतात. ज्यामुळे साप घराकडे फिरकत देखील नाही, आणि समजा सापाने जर घरात प्रवेश केलाच तर त्याला घरातून हुसकवण्यासाठी सुद्धा अशा काही पारंपारिक पदार्थांचा वापर केला जातो ज्यामुळे साप लगेचच घरातून बाहेर पडतो. पलामू जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आदिवासी समाजातील उमेश सिंह यांनी असे सांगितले आहे की, आदिवासी लोक आपल्या घराच्या परिसरात साप न येण्यासाठी वेखंडाचं झाडं लावतात. ज्यामुळे साप घरात प्रवेश करत नाहीत. वेखंडाच्या वनस्पतीमधून येणारा तीव्र वास सापाला दूर ठेवतो. ही वनस्पती घराशेजारी लावली तर साप चुकूनही घरात घुसत नाही. मात्र जर समजा घरात साप घुसला तर महुआ या औषधी झाडाच्या सालीपासून तयार करण्यात आलेले तेल जाळले जाते. असे केल्याने साप लगेचच घरातून पळतो. केरोसीनचा म्हणजेच रॉकेलचा वापर करूनही सापाला घरातुन बाहेर हाकलले जाऊ शकते. नक्कीच जर तुम्हीही ग्रामीण भागात राहत असाल किंवा तुमचे घर जंगला नजीक असेल तर तुम्हीही हे उपाय करून सापांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe