आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल, लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल

कला आणि वाणिज्य शाखेतून दरवर्षी लाखो विद्यार्थी उत्तीर्ण होतात. दरम्यान कला आणि वाणिज्य शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारकडून लवकरच एका महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे.

Published on -

Arts And Commerce Student Rule : सध्या दहावी आणि बारावीच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 15 मे 2025 पर्यंत लागू शकतो असे राज्य बोर्डाच्या अध्यक्षांकडून नुकतेच सांगितले गेले आहे. असे असतानाच आता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

ही बातमी सध्या आर्ट्स आणि कॉमर्समधून बारावी केलेल्या आणि भविष्यात आर्टस् आणि कॉमर्समधून बारावी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काळात कला आणि वाणिज्य शाखेतून बारावीची पदवी घेतलेली असली तरी सुद्धा विद्यार्थ्यांना पायलट म्हणजेच वैमानिक बनता येणार आहे. यासाठी लवकरच नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहेत डिटेल्स ?

खरे तर, महाराष्ट्रासहित देशभरातील लाखो विद्यार्थी कला आणि वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतात. यातील अनेक विद्यार्थ्यांना वैमानिक सुद्धा बनायचे असते. पण, सध्याच्या नियमानुसार फक्त 12 वी विज्ञान शाखेतील उत्तीर्ण त्यातल्या त्यात फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र आणि गणित या दोन विषयांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच वैमानिकाचा कोर्स करता येतो.

मात्र आता या नियमांमध्ये बदल होणार असा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिविल एव्हिएशन (DGCA) अर्थातच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या नियमांमध्ये बदल करण्यावर विचार करत असून तसे संकेत आता मिळू लागले.

वास्तविक पाहता 1990 च्या आधी वैमानिक बनण्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक होते. मात्र, 1990 नंतर व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी फिजिक्स आणि मॅथ या दोन विषयांसह विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो.

यामुळे 90 च्या दशकाच्या आधी जर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही संधी मिळत होती मग आता कला आणि वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही संधी का मिळू नये ? असा प्रश्न वैमानिक संघटनांकडून उपस्थित केला जात असून कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सुद्धा ही संधी मिळायलाच हवी अशी आग्रही मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.

तसेच, शालेय अभ्यासक्रमातील विज्ञान हे वैमानिकासाठी पुरेसे असल्याचे वैमानिक संघटनांकडून सांगितले जात आहे. महत्त्वाची बाब अशी की, वैमानिक संघटनांच्या या मागणीला आता यश येऊ शकते.

कारण डीजीसीएने नियमांमध्ये बदल करण्यासाठी अनुकूल असून यासाठी तयारी सुद्धा सुरू केली असल्याचा दावा केला जात असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी सरकारकडे म्हणजे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे वर्ग होणार असल्याचे समजते.

नक्कीच या प्रस्तावावर जर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला गेला तर यामुळे कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सुद्धा वैमानिक बनण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र अजून याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे गेलेला नाही यामुळे या संदर्भात पुढे काय होते ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe