Asian Paints च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, 6 महिन्यात 26% लॉस ! आता स्टॉक सेल करावा की होल्ड? स्टॉक मार्केट विश्लेषकांनी दिला मोठा सल्ला

गेल्या 6 महिन्यांत, ते 26.75 % कमी झाले आहे. या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक 3394.90 रुपये आणि 52 आठवड्याचा निचाँक 2207.80 रुपये इतका आहे. मात्र गेल्या 5 दिवसांत आशियाई पेंट्सचे शेअर्स 2.15% वाढले आहेत. आशियाई पेंट्सची मार्केट कॅप 2.18 लाख कोटी रुपये इतके आहे.

Tejas B Shelar
Published:

Asian Paints Share : गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, आशियाई पेंट्स लिमिटेडच्या बाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. कंपनीच्या तिमाही निकालातून समोर आलेल्या कमकुवत परिणामांनंतर आज शेअर बाजारात याचा परिणाम पाहायला मिळाला.

या कंपनीचे शेअर्स आज कमी झाले आहेत. आज या स्टॉकच्या किंमतीत 4% पेक्षा जास्त घट झाली आहे. खरेतर, एफवाय 2024-25 च्या तिसर्‍या तिमाहीत आशियाई पेंट्सने 1,110 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. दरम्यान, वार्षिक आधारावर हे शेअर्स 23% घसरले आहेत.

कंपनीने वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत 1,448 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. दरम्यान, आज सकाळी 10:30 च्या सुमारास, हा स्टॉक 3.65% घसरून 2268.30 रुपयांवर ट्रेड करीत होता. गेल्या एका वर्षात आशियाई पेंट्सचे शेअर्स 22 % पेक्षा जास्त कमी झाले आहेत.

तर, गेल्या 6 महिन्यांत, ते 26.75 % कमी झाले आहे. या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक 3394.90 रुपये आणि 52 आठवड्याचा निचाँक 2207.80 रुपये इतका आहे. मात्र गेल्या 5 दिवसांत आशियाई पेंट्सचे शेअर्स 2.15% वाढले आहेत.

आशियाई पेंट्सची मार्केट कॅप 2.18 लाख कोटी रुपये इतके आहे. अशा परिस्थितीत आज आपण आशियाई पेंट्सचे स्टॉक खरेदी करावेत, होल्ड करावेत की बाय करावेत याबाबत तज्ञांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तज्ञ काय सांगतात?

आशियाई पेंट्सला कव्हर करणाऱ्या एकूण 34 ब्रोकरेजपैकी 11 जणांनी या स्टॉकसाठी सेल रेटिंग दिली आहे म्हणजेच हा स्टॉक विक्री करण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच 5 अ‍ॅनालिस्टनी हा स्ट्रॉंग सेल आणि 10 ब्रोकरेजने होल्डचा सल्ला दिला आहे.

दुसरीकडे, 7 ब्रोकरेजकडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे आणि एकाने Strong Buy अशी रेटिंग दिली आहे.

कसे आहेत तिमाही निकाल ?

ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा महसूल 6 टक्क्यांनी कमी झाला आणि 8,549 कोटी रुपये झाला. एक वर्षापूर्वी, याच तिमाहीत कंपनीने 9,103 कोटी रुपये महसूल मिळविला होता. यात कोणताही खर्च किंवा कपात समाविष्ट नसतो.

दरम्यान, मागील तिमाहीच्या तुलनेत म्हणजे जुलै-सप्टेंबर या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा नफा 60%वाढला आहे. Q2FY25 मध्ये, कंपनीला 695 कोटी रुपयांचा नफा राहिला होता. पण यावेळी महसूल देखील 6%वाढला आहे. दुसर्‍या तिमाहीत कंपनीने 8,028 कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe