गोल्डन टाइम आला रें…; ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Published on -

Astro Fact : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम आता सुरू झाला आहे. राहूची युवा अवस्था सुरू झाली आहे.

या काळात अनेकांना नेत्रदीपक असे यश मिळणार आहे. राहू म्हणजे कलियुगाचा राजा. हा एक असा ग्रह आहे जो अनपेक्षित यश देण्यासाठी ओळखला जातो.

शुभ अवस्थेतील हा ग्रह कठीण परिस्थितीत सुद्धा एक नवीन विश्व उभारण्याची ताकद देतो. 15 एप्रिल पर्यंत राहु ग्रह अशाच शुभ अवस्थेत आहे. या ग्रहाची सध्या युवा अवस्था सुरू आहे आणि यामुळे या ग्रहाची ताकद दुपटीने वाढली आहे.

म्हणून तीन राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू झाला आहे. या काळात हे लोक अनपेक्षित असे यश संपादित करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. 

हमखास यश मिळणार 

मीन : या लोकांची विस्कटलेली आर्थिक घडी आता पुन्हा एकदा रुळावर येताना दिसेल. आर्थिक दृष्ट्या हा काळ या लोकांसाठी फायद्याचा राहील. व्यावसायिकांसाठी हा काळ फायद्याचा राहणार आहे. कुटुंबात अगदीच उत्साहाचे वातावरण राहील. परदेशी कंपन्यांशी संबंधित कामांमध्ये या काळात अधिक यश मिळेल. या राशीच्या लोकांचा हा खऱ्या अर्थाने एक गोल्डन टाईम राहणार आहे. ज्या गोष्टी आवाक्या बाहेर वाटत होत्या त्या सुद्धा या काळात पूर्ण होताना दिसतील.

कुंभ : या लोकांना अचानक संपत्ती प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहेत. वडिलोपार्जित संपत्ती मधून या लोकांना लाभ मिळू शकतो.  या राशीचे काही जातक नवीन घर किंवा नवीन मालमत्ता खरेदी करू शकतात. नव्या वाहनाच्या खरेदीचे योग पण बळावत आहेत. एखादी जुनी गुंतवणूक या काळात आर्थिक लाभ देऊन जाऊ शकते. या राशीच्या जातकांची समाजातील प्रतिष्ठा आणखी उंचावणार आहे.

धनु : बेरोजगार लोकांना नव्या नोकरीचे संकेत मिळत आहेत. आधीच नोकरीत असणाऱ्या लोकांना पगार वाढीसारखी भेट मिळू शकते. खोळंबलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील. परदेशी जाण्याचे पण योग आहेत. नोकरीमध्ये चांगली प्रगती होताना दिसेल आणि पैशांची कटकट दूर होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe