काय सांगता ! ‘या’ 4 तारखांना जन्मलेले लोक त्यांच्या वयाच्या 42 व्या वर्षानंतर यशस्वी होतात; 42 व्या वर्षानंतर मिळते धनसंपत्ती आणि मानसन्मान

अंकशास्त्र व्यक्तीच्या एका जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, भविष्य, पैसा, शिक्षण, आरोग्य, वैवाहिक जीवन अशाबाबींची माहिती देते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्म तारखेवरून मुलांक काढला जात असतो. हा मुळांक एक ते नऊ पर्यंत असतो. जसं की 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक हा एक असतो.

Published on -

Astrology Mulank Numerology : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. ज्याप्रमाणे ज्योतिषी हात पाहून भविष्य सांगतो त्याच धर्तीवर अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचे भविष्य समजते. वैदिक ज्योतिष शास्त्रात ग्रहांची स्थिती, ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन अशा वेगवेगळ्या बाबींवरून लोकांच्या भविष्याविषयी भाकीत वर्तवले जाते.

अंकशास्त्र व्यक्तीच्या एका जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, भविष्य, पैसा, शिक्षण, आरोग्य, वैवाहिक जीवन अशाबाबींची माहिती देते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्म तारखेवरून मुलांक काढला जात असतो. हा मुळांक एक ते नऊ पर्यंत असतो. जसं की 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक हा एक असतो.

दरम्यान आज आपण चार मूळांक असणाऱ्या म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचे भविष्य कसे असते, हे लोक त्यांच्या आयुष्यात कधी यशस्वी होतात, यांच्याकडे कधी पैसा येतो या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे असते 4 मुलांक असणाऱ्या लोकांचे भविष्य

या लोकांचा स्वामीग्रह राहू असतो. यामुळे या लोकांना सुरुवातीच्या काळात खूपच कष्ट करावे लागतात. मात्र नंतर या लोकांना सर्व सोयी सुविधा अन पैसा मिळतो. अंकशास्त्रातील जाणकार सांगतात की मुळांक 4 असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात 42 वर्षानंतर खऱ्या अर्थाने एक मोठा चेंज पाहायला मिळतो.

वयाची 42 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे लोक त्यांच्या क्षेत्रात चांगली प्रगती करतात. या वयानंतर या लोकांकडे अपार पैसा येतो. हे लोक 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. या लोकांची योजना खूपच उत्तम असते.

व्यवहारी विचार करणे, स्वभावाने थोडेसे रहस्यमयी असणे, कमी बोलणे हे या लोकांच्या स्वभावातील गुण. हे लोक हट्टी, मनाचे मालक असतात. यामुळे मात्र या लोकांना काही वाईट सवयी देखील लागतात. हे लोक आणि त्यांचा स्वभाव बदलत नाही.

हे लोक इतरांना दुखी पाहू शकत नाही. यांच्या रक्तातच प्रामाणिकपणा आणि मेहनत घेण्याचा गुण असतो. हे लोक नाते टिकवतात. मात्र यांना एकांतात राहणे अधिक प्रिय असते. या लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवला जाऊ शकतो. कारण की हे कधीच दगाफटका करत नाही.

आयुष्यात कितीही अडचणी आल्यात तरी देखील हे लोक न डगमगता आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरूच ठेवता. त्या लोकांचा खरा दागिना प्रामाणिकपणा आहे. त्यामुळे लोकं यांना विशेष प्रेम देतात. यांचे कौशल्य आणि प्रामाणिकपणा लोकांना आवडतो. साध्या स्वभावाची ही मंडळी आयुष्यात नेहमीच तडजोडी साठी तयार असते.

म्हणजेच सुखात आणि दुःखात यांना तडजोड करणे जमते आणि म्हणूनच हे आपल्या ध्येयाकडे आगेकूच करण्यात यशस्वी होतात. याच आपल्या स्वभाव गुणामुळे हे लोक लंबी रेस का घोडा असतात आणि किती अडचणी आल्यात तरी देखील चाळीस वर्षानंतर यशस्वी होऊन दाखवतात. सुरुवातीचा स्ट्रगल पिरेड संपला की या लोकांकडे भरपूर पैसा येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe