Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. फेब्रुवारी महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. विशेष बाब म्हणजे याच राशीत मायावी ग्रह राहू आधीच विराजमान आहे. सूर्य आणि राहू यांच्या युतीमुळे अशुभ ग्रहण योग निर्माण होत असून, त्याचा परिणाम काही राशींच्या जीवनावर नकारात्मक स्वरूपात जाणवू शकतो.
या काळात आरोग्य, आर्थिक स्थिती आणि मानसिक तणाव याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, विशेषतः कर्क, कन्या आणि मीन या तीन राशींसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो.

दरम्यान, न्यायाधीश शनि आणि संपत्ती देणारा शुक्र यांचे दुर्मिळ संयोजन काही राशींसाठी सकारात्मक संकेत देणारे असले, तरी सूर्य-राहू ग्रहण योगाचा परिणाम वरील तीन राशींवर अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कर्क राशी : कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि राहूची युती आठव्या घरात होणार आहे, जी सामान्यतः अनपेक्षित अडचणी आणि आरोग्य समस्यांचे संकेत देते. या काळात जुन्या किंवा लपलेल्या आजारांचा त्रास वाढू शकतो.
विशेषतः हृदयविकाराशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक तणाव, चिंता आणि भीती वाढण्याची शक्यता असून, नियमित आरोग्य तपासणी आणि जीवनशैलीत संयम ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
कन्या राशी : कन्या राशीच्या लोकांसाठी हा ग्रहण योग सहाव्या घरात निर्माण होत आहे. त्यामुळे कायदेशीर बाबी, न्यायालयीन प्रकरणे किंवा वाद-विवाद यामध्ये अडथळे येऊ शकतात.
गुप्त शत्रूंमुळे त्रास होण्याची शक्यता असून, घसा, छाती किंवा श्वसनाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. या काळात आर्थिक गुंतवणूक करताना विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मीन राशी : मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य-राहूची युती बाराव्या घरात होणार असल्याने खर्चात वाढ होऊ शकते. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.
तसेच, खोटे आरोप किंवा गैरसमज यामुळे सामाजिक प्रतिमेला धक्का बसू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये तणाव आणि अपयश येण्याची शक्यता असून, शनीच्या साडेसातीचा प्रभाव असल्याने आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
एकंदरीत, फेब्रुवारी महिन्यातील हा ग्रहण योग काही राशींसाठी सावधगिरीचा इशारा देत असून, संयम, योग्य नियोजन आणि आरोग्याची काळजी घेतल्यास या अडचणींवर मात करणे शक्य होईल.













