दररोज 7 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 5 हजार रुपयांची पेन्शन ! ‘या’ सरकारी योजनेचा म्हातारपणी मोठा दिलासा मिळणार

Atal Pension Yojana News : सरकारी क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी अर्थातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून त्यांच्या सेवाकाळानंतर त्यांना निवृत्तीवेतन दिले जाते. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते. मात्र खाजगी क्षेत्रातील असंघटित कामगारांना पेन्शन मिळत नाही. अशा परिस्थितीत उतार वयात असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

परिणामी अनेक जण उतार वयात हाती पैसे असावेत यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. विविध बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून उतार वयासाठी पैशांची उभारणी केली जाते.

याशिवाय अनेक जण पेन्शन योजनेमध्ये देखील गुंतवणूक करत आहे. दरम्यान जर तुम्हीही एखाद्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची राहणार आहे.

कारण की आज आपण एका सरकारी पेन्शन योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.आज आम्ही ज्या सरकारी पेन्शन योजनेची माहिती तुम्हाला देणार आहोत ती योजना आहे अटल पेन्शन योजना.

या योजनेत दररोज सात रुपयांची गुंतवणूक केल्यास 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिन्याला पाच हजार रुपयांची म्हणजेच वार्षिक 60 हजार रुपयांची पेन्शन तुम्हाला मिळणार आहे. आता आपण या पेन्शन योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे आहे या योजनेचे स्वरूप

जर तुम्ही अटल पेन्शन योजनेत 18 व्या वर्षी गुंतवणूक करण्याला सुरुवात केली आणि या योजनेतून महिन्याला पाच हजार रुपयाची पेन्शन हवी असेल तर दरमहा 210 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

जर तुम्हाला 1000 रुपयांची पेन्शन हवी असेल आणि तुम्ही 18 व्या वर्षी गुंतवणूक करण्याला सुरुवात केली तर तुम्हाला दरमहा 42 रुपये गुंतवावे लागणार आहेत.

अटल पेन्शन योजनेचे नियम काय आहेत?

अटल पेन्शन योजनेंतर्गत, ग्राहकांना दरमहा 1,000 रुपये ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. केंद्र सरकार ग्राहकांच्या योगदानाच्या 50 टक्के किंवा वार्षिक 1,000 रुपये, यापैकी जे कमी असेल ते योगदान देते.

सरकारी योगदान अशा लोकांना दिले जाते जे कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट नाहीत आणि करदाते नाहीत.

योजनेअंतर्गत 1,000, 2000, 3,000, 4,000 आणि 5,000 रुपये पेन्शन उपलब्ध आहे. पेन्शनच्या रकमेवरही गुंतवणूक अवलंबून असते. तुम्ही तरुण वयात सहभागी झाल्यास तुम्हाला अधिक फायदे मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe