Atal Pension Yojana : गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक अनिश्चितता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि यामुळे सर्वसामान्य चिंतेत सापडले आहेत. यामुळे अनेक जण आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित बनवण्यासाठी वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळत राहावी यासाठी अनेकजण पेन्शन योजनांमध्ये सुद्धा गुंतवणूक करताना दिसतात.
दरम्यान जर तुम्हाला हे अशाच एखाद्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करायचे असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे कारण की आज आपण केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या अशा एका पेन्शन योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला पाच हजार रुपयांची खात्रीशीर पेन्शन मिळत राहणार आहे.

कोणती आहे ती योजना?
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती योजना आहे अटल पेन्शन योजना. खरे तर असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोणत्याच पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे सरकारने असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून ही योजना डिझाईन केली आहे.
या अंतर्गत उतार वयात सर्वसामान्यांना आर्थिक सुरक्षा उपलब्ध करून दिली जात आहे. या योजनेतुन नागरिकांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते.
या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिकांना गुंतवणूक करता येते. या योजनेतील गुंतवणुकीची रक्कम ही वयोमानानुसार बदलते. या योजनेतून मिळणारी पेन्शन ही जमा रकमेच्या आधारावर असते.
पाच हजार रुपयांच्या पेन्शन साठी किती गुंतवणूक करावी लागणार
एखाद्या अठरा वर्ष व्यक्तीने या योजनेत खाते ओपन करून गुंतवणूक सुरू केली तर त्याला दर महिन्याला 210 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. 18 वर्षाच्या व्यक्तीने दर महिन्याला 210 रुपयांची गुंतवणूक केल्यास 60 वर्षानंतर मासिक पाच हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे.
त्याचवेळी तीस वर्षाच्या व्यक्तीने दर महा 577 रुपयांची गुंतवणूक केल्यास 60 वर्षानंतर 5000 ची पेन्शन मिळणार आहे. या योजनेत ऑक्टोबर 2022 नंतर आयकर भरणारे सामील होऊ शकत नाहीत. या योजनेत फक्त भारतीय नागरिकांना गुंतवणूक करता येते.
18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींनाच गुंतवणूक करता येते. या योजनेत जॉइंट अकाउंट ओपन करून पती-पत्नी दोघांना गुंतवणूक करता येते. योजनेत प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसाला गुंतवणुकीची रक्कम मिळते.













