ATM News : तुमचही बँकेत अकाउंट आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. ग्राहकांसाठी बँकेकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ग्राहकांना बँक एटीएम कार्ड सुद्धा ऑफर करते. एटीएम च्या माध्यमातून कार्डधारकांना पैसे काढता येतात तसेच पैसे डिपॉझिट करता येतात.
पण एटीएम मध्ये जाऊन कार्डधारकांना फक्त पैसे काढता येतात किंवा डिपॉझिट करता येतात असे नाही तर यामधून तुम्हाला इतरही अनेक कामे करता येतात. दरम्यान आज आपण एटीएम मधून ग्राहकांना कोणकोणती कामे करता येतात याबाबत डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एटीएममधून ही कामे देखील करता येतात
चेक बुक काढता येते – अलीकडे मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंट केले जाते. पण ऑनलाइन पेमेंट सोबतच अनेकजण चेकच्या मदतीनेही पेमेंट करतात. दरम्यान जर तुम्हाला सुद्धा चेकने पेमेंट करायचे असेल तर यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन चेक बुक साठी अर्ज करावा लागतो. विशेष म्हणजे आता चेकबुक साठी तुम्हाला एटीएम मधून सुद्धा अर्ज करता येणार आहे. एटीएम मधून अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी चेकबुक तुमच्या पत्त्यावर मिळते.
बँक अकाउंट स्टेटमेंट पण काढता येणार – एटीएम मधून तुम्हाला बँक अकाउंट स्टेटमेंट सुद्धा काढता येते. अकाउंट स्टेटमेंट तुम्हाला ताबडतोब प्रिंट करून मिळते. म्हणजेच बँक शाखेत न जाता तुम्हाला एटीएम मधूनच स्टेटमेंट मिळणार आहे.
खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करणे – एटीएम मध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटचा मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करता येऊ शकतो. पण ही सुविधा काही निवडक एटीएम मध्येच मिळते.
पिन बदलता येतो- एटीएम कार्डचा पिन तुम्हाला प्रत्येक एटीएम मध्ये बदलता येऊ शकतो. नवीन एटीएम असेल तर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन पिन जनरेट सुद्धा करू शकता.
दुसऱ्या बँक अकाउंट मध्ये पैसे पाठवता येते – एटीएम मध्ये जाऊन तुम्हाला एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात. दोन्ही अकाउंट एकाच बँकेचे असतील तर ही प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि जलद होते.
एटीएम द्वारे बिल पेमेंट करता येते – तुम्हाला आता एटीएम मध्ये जाऊन वीज, पाणी, मोबाईल किंवा गॅस बिले देखील भरता येतात.
खात्यातील शिल्लक तपासता येते – एटीएम मध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट मध्ये किती शिल्लक आहे याची माहिती पाहता येते. ही माहिती तुम्हाला एटीएम च्या स्क्रीनवरच दिसते.
मिनी स्टेटमेंट सुद्धा पाहता येते – एटीएम मध्ये जाऊन तुम्हाला मिनी स्टेटमेंट सुद्धा तपासता येणार आहे. एटीएम मध्ये जाऊन तुम्ही अलीकडील पाच ते दहा व्यवहारांची माहिती पाहू शकता.













