‘या’ सवयी टाळल्यास तुम्हाला कधी कॅन्सर होणार नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  सध्या कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळतं. तरुणांमध्येही आजकाल कर्करोग बळावत असल्याचं दिसून येतं आहे. अलीकडेच काही अभिनेत्यांच या कर्करोगानेच निधन झाल्याचे आपण वाचले असेल.

इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट कॅन्सर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँण्ड रिसर्च या संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दर वर्षी कर्करोगाचे ११,५७,२९४ रुग्ण नोंदविले जातात.

सुमारे २२.५ लाख रुग्ण या आजारासह जगत आहेत. त्याचप्रमाणे २०१८ साली कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७,८४,८२१ आहे. या आजाराला बदलत्या जीवनशैलीमुळे झालेले सर्वच बदल करणीभूत आहेत. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल केल्यास कर्करोगाचा धोका नक्कीच टाळता येऊ शकतो.

‘या’गोष्टी टाळा १. तंबाखू खाणे,सिगार ओढणे टाळा – सिगारेट ओढण्याने घशाचा कर्करोग (आठ पटीत), तोंडाचा व श्वासनलिकेच्या आरंभाचा कर्करोग (चार पटीत) तर मूत्राशय व पॅन्क्रियाजचा कर्करोग दोन पटीने होतो.

पाईप (चिलीम) किंवा सिगार ओढणाऱ्यांना याचा धोका अधिक असतो. इतकंच नाही तर जे सिगारेट ओढत नाहीत, पण सिगारेट ओढणाऱ्याच्या संपर्कात राहतात, अशांना केवळ सिगारेटच्या धुरामुळे कर्करोग होऊ शकतो.

सिगारेटमधील टारमुळे ३०% प्रमाणात कर्करोग होतो. त्यामुळे कर्करोगापासून दूर रहायचं असेल तर तंबाखू खाणं, सिगारेट ओढणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

२. मद्यपान – अतिप्रमाणात केलेले मद्यपान अनेक व्याधी बळावतो. मद्यपाणामुळे लिव्हर खराब होण्याचा संभव असतो. यामुळे यकृताचा कर्करोग होतो. तसंच तोंडाचा, घशाचा (अन्ननलिकेचा) ही कर्करोग होतो.

दारू पिणारे बहुतांश जणांना सिगारेट किंवा तंबाखूचं व्यसन असतं. मात्र या दोन्ही सवयी घातक आहेत.मद्यपान व धूम्रपान हे एकमेकांना पूरक असल्याने असे पदार्थ टाळण्यानेच कर्करोगाला आळा घालणे शक्य आहे.

३. मसालेदार पदार्थ मसालेदार पदार्थ, किवा गरम पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते. परंतु यामुळे कर्करोगाला आमंत्रण मिळू शकतं. मसालेदार व गरम पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्याने फुफ्फुसे, तोंड, अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो सात्विक, साध्या पद्धतीच्या जेवणाचा आहारात समावेश करावा.

४.अतिनील किरण – सुर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होत असतो. परिणामी त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत उन्हात फिरणं टाळा.

५.व्यायामाचा अभाव – व्यायाम करणे हे अनेक रोगांवरील रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

बऱ्याच वेळा आपण मेदयुक्त पदार्थांचं सेवन करत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना कर्करोगाचा धोका असतो. म्हणून नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment