Baba Vanga Prediction : आज सकाळपासून सर्वत्र ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरू आहे. भारतात तर ऑपरेशन सिंदूर ची चर्चा होतच आहे पण जगातील इतर देशांमध्ये ही जय हिंदच्या या सेनेच्या पराक्रमाची दखल घेतली जात आहे. इजराइल सारख्या ताकदवर देशाने भारतात ने केलेल्या या दहशतवादी विरोधी कारवाईला पूर्ण समर्थन दिले आहे.
तर काही देशांनी दोन्ही देशांना अर्थातच भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आणि संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमेरिका चीन समवेत अनेक देशांनी याप्रकरणी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

खरे तर भारत पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला चढवणार हे फिक्स होते. मात्र ही कारवाई कशी होते याबाबत कोणालाच कल्पना नव्हती. अखेर कार भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला गेला असून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत.
यामुळे पहलगांमधील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतला असल्याचे बोलले जात आहे. पण भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर बाबा वेंगा यांची एक भविष्यवाणी चर्चेत आली आहे. दरम्यान आता आपण ऑपरेशन सिंदूर नंतर बाबा भिंगा यांची चर्चेत आलेली भविष्यवाणी नेमकी काय आहे याचीच माहिती पाहणार आहोत.
बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरते
बाबा वेंगा यांची अनेक भाकीत आत्तापर्यंत खरी ठरले असल्याचा दावा केला जातो. खरे तर बाबा वेंगा या अंध होत्या मात्र त्यांची भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही असा दावा त्यांचे फॉलोवर्स करत असतात.
अमेरिकेतील 9 / 11 चा दहशतवादी हल्ला, 1997 मध्ये राजकुमारी डायना चा मृत्यू आणि कोरोना साथीच्या आजाराबाबत त्यांनी अचूक भविष्यवाणी केली होती असे त्यांचे फॉलोवर्स सांगतात. महत्त्वाची बाब म्हणजे मार्च महिन्यात म्यानमार मध्ये आलेल्या भूकंपाबाबत सुद्धा त्यांनी आधीच अंदाज वर्तवला होता असे सांगितले जाते.
खरे तर म्यानमार मध्ये आलेल्या या 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर याचा प्रभाव थायलंडमध्येही दिसला आणि थायलंड मधील भूकंपात दहा लोक मरण पावलीत. असं म्हणतात की, बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये विनाशकारी भूकंपांचा अंदाज आधीच वर्तवला होता.
भारत – पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगा यांची भविष्यवाणी काय ?
दरम्यान, बाबा वेंगा यांनी भारत – पाकिस्तान युद्धाबाबत सुद्धा मोठा दावा केला असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार, बाबा वांगाने युरोपचा पाया हादरवून टाकणारा संघर्ष जगाला पाहायला मिळेल असे भाकीत केले होते.
पण, अनेक वर्षांपूर्वी केलेल्या या भविष्यवाणीत त्यांनी कोणत्याही देशाचं नाव घेतलेले नाही. मात्र सध्या भारतात आणि पाकिस्तानातील परिस्थिती फारच तणावपूर्ण बनली आहे. भारताने एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.
तर या कारवाईमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन मध्ये वॉर सुरू आहे आणि इजराइलने गाजा पट्टीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एक मोहीम हाती घेतलेली आहे.
अशा परिस्थितीत बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी चर्चेत आली आहे. जगात अस्थिरता वाढत असतानाच अनेक वर्षांपूर्वी केलेली बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी आज पुन्हा चर्चेत आली असून भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर या भविष्यवाणीची चर्चा अधिक होऊ लागली आहे.