इलेक्ट्रिक स्कूटर चेतक EMI वर खरेदी केल्यास किती रुपयांचा हफ्ता भरावा लागणार ?

Published on -

Bajaj Chetak EMI : गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली जात आहे. इलेक्ट्रिक कार्स तसेच स्कूटरस बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत.

कंपन्या देखील आपला इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ मजबूत करत आहेत. दरम्यान तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचे असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.

खरेतर, परवडणाऱ्या रेट मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी बजाज ऑटोने अलीकडेच एक नवीन स्कूटर लॉन्च केली.

बजाज चेतक C25 हा नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च झाल्यापासून चर्चेत आहे आणि आज आपण ही गाडी हप्त्यावर खरेदी करायची असल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार याचं कॅल्क्युलेशन येथे समजून घेणार आहोत. 

स्वस्तात मस्त मॉडेल

बजाज चेतक C25 ची किंमत 91,399 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ब्रँड इमेज, जबरदस्त बिल्ड क्वालिटी व मोठं सर्व्हिस नेटवर्क यामुळे हा स्कूटर ग्राहकांना आकर्षित करणार आहे. 

एकदा चार्ज करा अन 113 KM सुसाट

ही स्कूटर डेली यूज साठी फारच उपयोगाची ठरू शकते. महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार मंडळी साठी ही गाडी एक बेस्ट ऑप्शन राहील. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 113 किलोमीटर चालते.

त्यामुळे ऑफिसला जाणे, बाजारहाट किंवा दैनंदिन वापरासाठी तो पुरेसा ठरतो. या स्कूटरची टॉप स्पीड 55 किमी प्रतितास इतकी असून, शहरातील ट्रॅफिक परिस्थितीसाठी ती योग्य मानली जाते.

जरी याच किंमत श्रेणीत काही स्पर्धक जास्त स्पीड किंवा अधिक फीचर्स देत असले, तरी बजाज चेतक C25 ची खरी ताकद म्हणजे बजाज ब्रँडची विश्वासार्हता, मजबूत मेटल बॉडी आणि सहज उपलब्ध सर्व्हिस सुविधा.

EMI वर खरेदीचा पर्याय

DPकर्जाचा व्याजदरLoan PeriodLoan AmountEMIएकूण व्याज
30,0007.5%1261,39953272523
7.5%2461,39927634911
8%1261,39953412693
8%2461,39927775247

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe