भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांना रोखण्यासाठी अमित शहा ॲक्शन मोडवर ! संगमनेरात भाजपाच्या गुजरात टीमने तंबू ठोकला

अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिसून येत आहे. यामुळे सध्या नगरमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. राजकीय विश्लेषकांसहित साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष आता अहमदनगरकडे त्यातल्या त्यात संगमनेराकडे वेधले गेले आहे. कदाचित हेच कारण आहे की आता भारतीय जनता पक्ष देखील नगर कडे विशेष लक्ष ठेवून आहे. यासाठी गुजरात भाजपाची टीम अहमदनगर मध्ये दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

Tejas B Shelar
Published:
Balasaheb Thorat

Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सहित महाविकास आघाडीतील घटक पक्षांना चांगली दमदार कामगिरी करता आली. यामुळे गदगद झालेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जय्यत तयारी सुरू केली आहे. गेल्या 10 वर्षात प्रथमच काँग्रेस एवढ्या कमालीच्या फॉर्ममध्ये दिसत आहे. काँग्रेसने येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे.

महत्त्वाचे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिसून येत आहे. यामुळे सध्या नगरमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. राजकीय विश्लेषकांसहित साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष आता अहमदनगरकडे त्यातल्या त्यात संगमनेराकडे वेधले गेले आहे. कदाचित हेच कारण आहे की आता भारतीय जनता पक्ष देखील नगर कडे विशेष लक्ष ठेवून आहे. यासाठी गुजरात भाजपाची टीम अहमदनगर मध्ये दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये गुजरात मधील भाजपच्या खास आमदारांचा सुद्धा समावेश आहे. यातील दोन आमदार थेट बाळासाहेब थोरात यांना काउंटर करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीची सूत्रे भाजपाचे चाणक्य अशी ओळख असणाऱ्या अमित शहा यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहेत. यासाठी त्यांच्या विश्वासातील गुजरात मधील अनेक आमदार आणि मंत्री अहमदनगर मध्ये तळ ठोकून आहेत आणि आगामी निवडणुकीची या मंडळीकडून रणनीती तयार केली जात आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात गुजरात मधील जगदीश मकवाना आणि किशोरीलाल बेनीवाल या दोन आमदारांनी प्रत्यक्षात कामही सुरू केले आहे. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत हे आमदार येथेच तळ ठोकून राहणार अशी बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी नाशिक येथे अहमदनगर मधील तेरा मतदारसंघात काय नियोजन करायचे याबाबत भाजपाची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीसाठी गुजरातचे काही आमदार उपस्थित होते. विधानसभा निवडणुकी संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. या बैठकीनंतर अहमदनगर जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघासाठी एक आमदाराची नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर ज्या आमदारांची नियुक्ती झाली आहे ते आमदार संबंधित मतदार संघात पोहोचले देखील आहेत.

या आमदारांनी जिल्ह्यातील संबंधित मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आता प्रत्यक्षात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. संगमनेर मतदार संघाबाबत बोलायचं झालं तर गेल्यावेळी येथून बाळासाहेब थोरात यांना 1.25 लाख मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या शिवसेनेच्या साहेबराव नवले यांना 62000 मते मिळाली होती.

पण, गेल्या काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. बाळासाहेब थोरात हे अखिल भारतीय काँग्रेस महा समितीच्या सदस्य पदी नियुक्त करण्यात आले आहेत.

यामुळे संगमनेरात भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस कडून बाळासाहेब थोरात यांना प्रोजेक्ट केले जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यंदा फक्त थोरात यांना नाही तर भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांना मतदान करायचे अशा प्रकारचे बीज मतदारांमध्ये रुजवले जात आहे. याच सर्व गोष्टी विचारात घेऊन केंद्रीय भाजप आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

भाजपाचे दिग्गज नेते अमित शहा यांनी या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुजरात मधील एक विशेष टीम अहमदनगर मध्ये पाठवली आहे. संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासाठी या टीमकडून नियोजन केले जाणार आहे. त्यातल्या त्यात संगमनेर मतदार संघासाठी या टीमकडून खास नियोजन केले जाणार आहे.

यामुळे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विश्वासू लोकांचे ही टीम यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काय चमत्कार घडवून आणते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपामुळे भारतीय जनता पक्षाला यंदाच्या निवडणुकीत किती फायदा मिळतो? संगमनेर मतदार संघात खरंच उलटफेर होऊ शकतो का? या सर्व बाबी पाहण्यासारख्या ठरणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe