बातमी कामाची ! चेकवर Only लिहलं नाही तर चेक बाऊन्स होतो का? नियम काय सांगतात

पैशांच्या व्यवहारासाठी चेकचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. अनेकांच्या माध्यमातून चेकमध्ये रक्कम भरताना /- हे चिन्ह वापरणे आणि तसेच शब्दांमध्ये रक्कम लिहिताना Only किंवा फक्त लिहिणे अनिवार्य असते का? असा प्रश्न उपस्थित केला जातो.

Tejas B Shelar
Published:
Bank Cheque Rules

Bank Cheque Rules : तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत खाते असेल नाही का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची राहणार आहे. विशेषता जे लोक चेकने पेमेंट करत असतील किंवा स्वीकारत असतील किंवा चेकचा वापर करून बँकेतून पैसे काढत असतील त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे.

अलीकडे नेट बँकिंग मुळे तसेच यूपीआय पेमेंट मुळे पैशांचे व्यवहार हे फारच सोयीचे झाले आहेत. ऑनलाइन पेमेंटमुळे बँक ग्राहकांना कोणालाही आणि केव्हाही सहजतेने पैसे पाठवता येतात. पण आजही काही लोक पैशांच्या व्यवहारासाठी चेकचा वापर करतात.

दरम्यान पैशांच्या व्यवहारासाठी चेकचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. अनेकांच्या माध्यमातून चेकमध्ये रक्कम भरताना /- हे चिन्ह वापरणे आणि तसेच शब्दांमध्ये रक्कम लिहिताना Only किंवा फक्त लिहिणे अनिवार्य असते का? असा प्रश्न उपस्थित केला जातो.

याशिवाय जर चेक मध्ये ओन्ली लिहिले नाही तर असा चेक बाउन्स होतो का असाही प्रश्न बँक ग्राहकांकडून उपस्थित होतोय. दरम्यान आज आपण याच संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जर चेकवर शब्दात रक्कम लिहिल्यानंतर ओन्ली नाही लिहिलं किंवा नंबर्समध्ये रक्कम भरल्यावर /- हे चिन्ह नाही टाकलं तर चेक बाऊन्स होत नाही. पण चेक मध्ये रक्कम भरल्यानंतर /- हे चिन्ह आणि Only टाकायला हवे.

यामुळे चेकची सुरक्षितता वाढते. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला चेकद्वारे 1,00,000 रुपये दिलेत अन ही रक्कम तुम्ही वर्ड्समध्ये लिहिली. तुम्ही शब्दात एक लाख रुपये असे लिहले अन त्यानंतर तुम्ही ओन्ली हा शब्द लिहिला नाही तर समोरचा व्यक्ती तुमच्या चेकवरील रक्कम वाढवून तुमची फसवणूक करू शकतो.

त्यामुळेच एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होऊ नये, कोणतीही चालबाजी होऊ नये म्हणून रक्कमेचा आकडा लिहिल्यानंतर ओन्ली किंवा फक्त असं लिहिलं जातं. तसेच नंबर्समध्ये रकम लिहिल्यानंतर त्याच्या शेवटी /- असं चिन्ह टाकणंही आवश्यक असतं.

याचा अर्थ रक्कम इथे संपली आहे, असा होता. त्यामुळे कोणीही तुमच्या नंबर्सच्या नंतर शून्य वाढवू शकणार नाही. म्हणून चेकवर रक्कम लिहिताना तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe