Bank Holiday : आज, २७ जानेवारी २०२६ रोजी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. बँक कर्मचारी युनियनच्या आहवालानुसार, बँक अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर उतरले आहेत. या संपाचा थेट परिणाम बँक सेवा आणि ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारांवर होण्याची शक्यता आहे.
भारतीय बँक कर्मचाऱ्यांच्या युनियनच्या म्हणण्यानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया, नॅशनल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक अशा प्रमुख बँकांमध्ये कर्मचारी मोठ्या प्रमाणावर या संपात सहभागी होत आहेत. काही शहरांमध्ये हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप घेण्याची शक्यता आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार आज २७ जानेवारीला बँकांना कोणतीही अधिकृत सुट्टी नाही. रिझर्व्ह बँक प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीस बँक सुट्ट्यांची यादी जाहीर करते.
मात्र, बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज अनेक शाखा बंद राहतील आणि ग्राहकांच्या व्यवहारांवर परिणाम होईल. त्यामुळे आज बँकेत जाण्यापूर्वी आपल्या शाखा सुरु आहेत की नाही हे तपासणे गरजेचे आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या युनियनची मुख्य मागणी आहे की, बँक कर्मचाऱ्यांना पूर्ण पाच दिवसांची आठवड्याची कामाची सोय द्यावी, म्हणजे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस सुट्टी मिळावी. सध्या बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी आहे.
कर्मचाऱ्यांच्या युनियनचे म्हणणे आहे की, सरकारकडे हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून सादर केला आहे, मात्र अद्याप तो मान्य झालेला नाही. जर ही मागणी मान्य न झाली तर आंदोलन अजून तीव्र होईल, असेही युनियनने स्पष्ट केले आहे.
ग्राहकांनी आजच्या दिवशी बँकेच्या कामकाजाची माहिती आधीच मिळवून आपली आर्थिक व्यवहाराची योजना आखावी. खास करून रोख व्यवहार, चेक क्लीयरिंग, कर्ज व्यवहार किंवा इतर बँकिंग सेवा यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. बँक कर्मचाऱ्यांचा हा संप त्यांच्या मागण्यांसाठी एक जोरदार संदेश देण्याच्या हेतूने आहे.
संपाचे परिणाम देशभरातील ग्राहक, लघु उद्योग, तसेच मोठ्या कंपन्यांच्या बँक व्यवहारांवर जाणवू शकतात. त्यामुळे ग्राहकांनी काळजीपूर्वक योजना आखणे गरजेचे आहे.
आजच्या दिवशी बँक सेवा थोड्या मर्यादित स्वरूपात उपलब्ध राहतील, त्यामुळे आवश्यक तेवढे व्यवहार पूर्ण करणे सुरक्षित राहील.













