फेब्रुवारीत बँकांना अनेक सुट्ट्या; महत्त्वाची कामे असतील तर आधीच करा नियोजन

Published on -

Bank Holiday : जानेवारी महिना संपत आला असून आता फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होत आहे. दरम्यान, फेब्रुवारीत बँकांना अनेक सुट्ट्या असल्याने बँकिंग कामांचे योग्य नियोजन करणे नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फेब्रुवारी महिन्यासाठी बँकांच्या अधिकृत सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध राज्यांतील सण-उत्सवांमुळे असणाऱ्या सुट्ट्यांचा समावेश आहे.

फेब्रुवारी महिन्यात काही दिवस देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत, तर काही सुट्ट्या राज्यनिहाय असणार आहेत. त्यामुळे तुमचे जर बँकेत शाखेसंबंधित महत्त्वाचे काम असेल, तर सुट्ट्यांची यादी आधी तपासणे आवश्यक आहे. अन्यथा वेळ आणि मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीतील साप्ताहिक बँक सुट्ट्या

फेब्रुवारी महिन्यातील रविवारी देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. १ फेब्रुवारी, १५ फेब्रुवारी आणि २२ फेब्रुवारी हे रविवार असल्याने या दिवशी बँका बंद असतील. तसेच १४ फेब्रुवारी हा दुसरा शनिवार आणि २८ फेब्रुवारी हा चौथा शनिवार असल्याने या दोन्ही दिवशीही देशातील सर्व बँकांना सुट्टी राहणार आहे.

सण-उत्सवांमुळे जाहीर सुट्ट्या

फेब्रुवारीत विविध सणांमुळे काही राज्यांमध्ये अतिरिक्त बँक सुट्ट्या असणार आहेत. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

१८ फेब्रुवारीला सिक्कीममध्ये लोसार सणानिमित्त बँक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँका बंद राहणार आहेत. तसेच २० फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममध्ये राज्य स्थापना दिवसानिमित्त बँकांना सुट्टी असेल.

ऑनलाइन सेवा सुरूच राहणार

बँकांना सुट्टी असली तरी ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत. यूपीआय, एटीएम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अशा सुविधा नेहमीप्रमाणे उपलब्ध असतील.

मात्र, शाखेसंबंधित कामे जसे की पासबुक प्रिंटिंग, कॅश डिपॉझिट, चेक क्लिअरन्स यांसारखी कामे या सुट्ट्यांच्या काळात होणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी बँकिंग कामांचे नियोजन सुट्ट्यांपूर्वीच करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe