बँक ऑफ बडोदाकडून 5 लाख रुपयांचे Car Loan घेतल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागेल ? पहा….

गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष. दरम्यान या मराठी नववर्षाला अनेक जण नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुम्हालाही यंदाच्या गुढीपाडव्याला नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

Published on -

Bank Of Baroda Car Loan Details : मंडळी तुम्हाला ही नवीन कार खरेदी करायची आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. येत्या काही दिवसांनी राज्यात गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा होणार आहे. गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष. दरम्यान या मराठी नववर्षाला अनेक जण नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.

दरवर्षी गुढीपाडव्याला अनेक जण नवीन वाहन किंवा नवीन प्रॉपर्टी खरेदी करतात. दरम्यान जर तुम्हालाही यंदाच्या गुढीपाडव्याला नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

विशेषता ज्यांना कार खरेदीसाठी फायनान्स करायचे असेल म्हणजेच कार लोन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे.

कारण की आज आपण बँक ऑफ बडोदा कडून पाच लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार याचे कॅल्क्युलेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बँक ऑफ बडोदाचे कार लोनचे व्याजदर

बँक ऑफ बडोदा ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट मध्ये कार लोन सुद्धा उपलब्ध करून देते. मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना किमान 8.80% व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देते. परंतु हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे.

या व्याजदरात कार लोन घ्यायचे असेल तर ग्राहकांचा सिबिल स्कोर हा स्ट्रॉंग असणे आवश्यक आहे. किमान 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या लोकांना या व्याजदरात बँकेकडून कार लोन उपलब्ध होऊ शकते.

5 लाखांचे कार लोन घेतल्यास किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार?

बँक ऑफ बडोदा कडून जर बँकेच्या सुरुवातीच्या व्याजदरात म्हणजेच 9% वार्षिक व्याजदरात पाच लाख रुपयांचे कार लोन पाच वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर संबंधित ग्राहकाला दहा हजार 379 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

त्याचवेळी जर कर्ज परतफेडीचा कालावधी सात वर्षे इतका ठेवला गेला तर कर्जाचा ईएमआय आठ हजार 45 रुपये इतका होणार आहे.

पण कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवला तर तुम्हाला अधिकचे व्याज द्यावे लागणार आहे यामुळे शक्यतो कर्ज परतफेडीचा कालावधी हा कमीत कमी ठेवावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe