Bank Of Baroda कडून 60 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा हप्ता द्यावा लागणार ? किती डाऊन पेमेंट करावे लागणार? पहा….

बँक ऑफ बडोदा ही गव्हर्मेंट बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते. अशा परिस्थितीत आज आपण बँक ऑफ बडोदा च्या होम लोन ची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बँक ऑफ बडोदाचे होम लोन चे सध्याचे व्याजदर अन इतर महत्त्वाची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हालाही आगामी काळात होम लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदाचे Home Loan फायद्याचे ठरणार आहे.

Tejas B Shelar
Published:

Bank Of Baroda Home Loan EMI : आपले हक्काचे एक घर असावे असे प्रत्येक मध्यमवर्गीयाचे स्वप्न असते. मात्र अलीकडे घरांच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत की साऱ्यांनाच घराचे स्वप्न सहजासहजी पूर्ण करता येत नाही. मध्यमवर्गीयांना घर खरेदी करण्यासाठी आपल्या आयुष्याची सर्व जमापुंजी खर्च करावी लागते.

दुसरीकडे घरांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने आता घर भाडे सुद्धा महाग झाली. यामुळे संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरात तर काढता येणार नाही. म्हणूनच अनेक जण बँकांकडून होम लोन घेऊन घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करतात.

दरम्यान जर तुम्हाला ही नवीन घर खरेदी करायची असेल आणि यासाठी तुम्ही होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. आज आपण बँक ऑफ बडोदाच्या होम लोनच्या व्याजदराची अन बँकेकडून 60 लाख रुपयांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार याची सुद्धा माहिती पाहणार आहोत.

बँक ऑफ बडोदाचे Home Loan साठीचे व्याजदर

बँक ऑफ बारोडाच्या गृह कर्जाच्या व्याजदराबाबत बोलायचं झालं तर बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 8.40% व्याजदराने Home Loan दिले जात आहे. पण बँकेचा हा किमान व्याजदर आहे. या व्याजदराचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळणार आहे.

800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना या व्याजदरात बँकेकडून होम लोन उपलब्ध होते अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणजे आपल्या Cibil स्कोअरनुसार बदलू शकतो.

जर आपण बँकेकडून 60 लाखांचे गृह कर्ज घेतले तर आपल्याला यासाठी घराच्या एकूण रकमेपैकी 10 टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून द्यावी लागणार आहे. म्हणजे जर तुम्हाला 60 लाखाचे घर घ्यायचे असेल तर तुम्हाला सहा लाख रुपये डाऊन पेमेंट म्हणून द्यावे लागणार आहेत.

अर्थातच आपल्याला बँकेकडून 54 लाख रुपयांचे गृह कर्ज मिळणार आहे. जर आपण 30 वर्षांच्या कालावधीसाठी 54 लाखांचे कर्ज घेतले तर तुम्हाला मासिक 41,139 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.

जर आपण दरमहा 30 वर्षांसाठी ईएमआय म्हणून 41,139 रुपये दिले तर आपण बँकेला एकूण 1,48,10,124 रुपये द्याल.  म्हणजे तुम्हाला बँकेला 94,10,124 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe