Bank Of Baroda Home Loan : तुम्हालाही नवं घर खरेदी करायचा आहे का आणि यासाठी तुम्ही होम लोन घेणार आहात मग आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहू शकतो. विशेषता ज्यांना बँक ऑफ बडोदाकडून गृह कर्ज घ्यायचे असेल त्यांच्यासाठी हा लेख फायद्याचा राहील.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, अहिल्यानगर सारख्या मोठ्या शहरांत स्वतःचे घर असावे, हे अनेकांचे स्वप्न असते. पण या महानगरांमध्ये प्रॉपर्टीच्या किमती अगदीच गगनचुंबी इमारतींसारख्या वाढलेल्या आहेत.

उच्च प्रॉपर्टी किमतीमुळे बहुतेकांना या महानगरांमध्ये घर घेणे शक्य होत नाही आणि अशा सर्वसामान्य लोकांना होम लोनवर अवलंबून राहावे लागते.
दरम्यान यावर्षी होम लोन घेणाऱ्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे. यंदा रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये केलेली कपात घरखरेदीदारांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
आरबीआयने रेपो रेट 1 टक्क्याने कमी केल्यानंतर देशभरातील अनेक बँकांनी कर्जावरील व्याजदरात कपात केली आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने देखील होम लोन व्याजदरात कपात करून कर्जदारांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
बँक ऑफ बडोदाचे नवीन व्याजदर
बँक ऑफ बडोदा ही सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे आणि ही बँक सध्या आपल्या ग्राहकांना आता 7.45 टक्के व्याजदराने होम लोन उपलब्ध करून देत आहे.
हा व्याजदर सध्याच्या बाजारपेठेतील स्पर्धात्मक दरांपैकी एक मानला जात आहे. मोठ्या शहरांमध्ये घरखरेदीचे नियोजन करणाऱ्यांसाठी हा दर फायदेशीर ठरणार आहे.
60 लाखांच्या होम लोनसाठी आवश्यक पगार
बँक ऑफ बडोदामधून 30 वर्षांच्या कालावधीसाठी 60 लाख रुपयांचे होम लोन मंजूर करून घेण्यासाठी अर्जदाराचा मासिक पगार किमान 83,500 रुपये असावा, असे बँकेचे मानदंड आहेत.
यामध्ये एक महत्त्वाची अट म्हणजे अर्जदारावर कोणतेही इतर कर्ज सुरु नसावे. कारण अतिरिक्त कर्ज असल्यास कर्जफेड क्षमता कमी होते आणि बँक अर्ज नाकारू शकते.
ईएमआय किती असेल?
7.45 टक्के व्याजदराने 60 लाखांचे कर्ज घेतल्यास दरमहा सुमारे 41 हजार 750 रुपये इतका ईएमआय भरावा लागेल. त्यामुळे नवीन घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी आपली आर्थिक क्षमता, खर्च आणि कर्जफेड करण्याची क्षमता याचा नीट विचार करणे आवश्यक आहे.
कर्ज मंजुरीमध्ये क्रेडिट स्कोअर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. चांगला स्कोअर असल्यास व्याजदरात सवलत मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घरखरेदीचा विचार करणाऱ्यांनी वेळेवर कर्जफेड करून आपला क्रेडिट स्कोअर मजबूत ठेवणे गरजेचे आहे.













