Bank Of Baroda Home Loan : अलीकडे जमिनीचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जमिनीला अक्षरशा सोन्यासारखा भाव मिळतो. यामुळे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. प्लॉट, फ्लॅट, बंगलो, रो-हाऊस घेणं आता सोपं नाहीये.
वाढत्या महागाईमुळे घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या स्वप्नापलीकडील गोष्ट बनली आहे. मात्र बँकांच्या आर्थिक मदतीमुळे अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनेकजण घर खरेदीसाठी बँकांकडून होम लोन घेतात.

बँका देखील ग्राहकांना अल्प व्याजदरात होम लोनची सुविधा उपलब्ध करून देतात. अलीकडे तर होम लोनचे व्याजदर बऱ्यापैकी कमी झाले आहेत. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध बँकांनी होम लोनचे व्याजदर कमी केले आहेत.
म्हणूनच हा काळ होम लोन घेणाऱ्यांसाठी सुवर्णकाळ बनलाय. अशा स्थितीत जर तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल विशेषता बँक ऑफ बडोदा कडून जर तुम्ही होम लोन घेणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरेल.
कसे आहे बँक ऑफ बडोदाचे होम लोन
बँक ऑफ बडोदा कडून आपल्या ग्राहकांना अल्प व्याजदरात होम लोन दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या स्थितीला बँक ऑफ बडोदा किमान 7.45% व्याजदरात ग्राहकांना गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. इतर बँकांशी तुलना केली असता बँक ऑफ बडोदाचा हा व्याजदर कमी आहे.
बँक ऑफ बडोदा ही देशातील प्रमुख सरकारी बँक आहे आणि या बँकेकडून अनेक जण होम लोन घेतात. पण हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे आणि याचा फायदा सिबिल स्कोर चांगल्या असणाऱ्या ग्राहकांना मिळतो.
10 वर्षांसाठी 25 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा ईएमआय भरावा लागेल?
बँक ऑफ बडोदा कडून जर किमान 7.45% व्याजदरात दहा वर्षांसाठी 25 लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर झाले तर ग्राहकाला 29,610 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजे सदर ग्राहकाला दहा वर्षांच्या काळात बँकेला एकूण 35 लाख 53 हजार दोनशे रुपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये मुद्दल आणि व्याज याचा समावेश आहे. अर्थात पंचवीस लाखांच्या गृह कर्जासाठी व्याज म्हणून दहा लाख 53 हजार दोनशे रुपये भरावे लागतील.