Bank Of Maharashtra : शेअर मार्केट मधील कंपन्या वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स, डिव्हीडंड, स्टॉक स्प्लिट असे लाभ पुरवत असतात. लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी हाती आली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. महाराष्ट्राभर यांच्या शाखा आहेत. तसेच राज्याबाहेर देखील यांचा विस्तार झाला आहे. आता या बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा केलेली आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाचा मोठा निर्णय !
BOM च्या संचालक मंडळाने नुकताच अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. यावेळी बँकेकडून दहा टक्के अंतरीम लाभांश देण्यात येणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक दहा रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या शेअरवर एक रुपयांचा लाभांश मिळणार आहे.
याची रेकॉर्ड तारीख सुद्धा जाहीर झाली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या लाभांशासाठी 20 जानेवारी 2026 ही रेकॉर्ड तारीख जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीचे रेकॉर्ड बुक मध्ये असेल त्यांना लाभांशाचा लाभ मिळणार आहे.
शेअर्स खरेदी केव्हा करावी?
लाभांशाचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला 19 तारखेपर्यंत शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत. BOM ने नूकतेच तिमाही निकाल जाहीर केलेत. यामध्ये नफा सत्तावीस टक्क्यांनी वाढला आहे. याचे शेअर्स आज 65 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहेत.
आता बँकेकडून लाभांशाची घोषणा करण्यात आली असल्याने शेअर्समध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त होत आहे. लाभांश जाहीर केल्यापासून बँक ऑफ महाराष्ट्राचे शेअर्स फोकस मध्ये आहेत आणि येत्या काळात याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.













