बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील तरी ग्राहकांना 10 हजार रुपये काढता येणार ! कोणत्या ग्राहकांना मिळणार लाभ ? वाचा सविस्तर

बँकेत अकाउंट असणाऱ्या खातेधारकांना बँकेकडून विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात. बँक खातेधारकांना त्यातील काही सुविधा विनाशुल्क तर काही सुविधा शुल्कसहित मिळतात. बँक आपल्या ग्राहकांना कर्जाची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देते.

Published on -

Bank Overdraft : तुमचेही बँकेत अकॉउंट आहे का? मग आजची ही बातमी तुमच्या कामाचीच आहे. खरे तर बँक ग्राहकांना बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यातील काही सुविधांसाठी बँकेला आपल्याला शुल्क द्यावे लागते तर काही सुविधा विनाशुल्क सुद्धा उपलब्ध होतात. बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज सुद्धा उपलब्ध करून देते.

एवढेच नाही तर बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी ओव्हरड्राफ्ट सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाते. खरेतर, आपल्याला कधी-कधी अचानक पैशांची गरज भासते आणिआपल्याकडे पैसेच नसतात. बँक अकाउंट सुद्धा खाली असते आणि अशावेळी आपल्याला मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

कित्येकदा तर मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून सुद्धा पैसे उपलब्ध होत नाहीत. मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे नसले तरी सुद्धा तुम्ही पैसे काढू शकतात तर? खरे तर बँकेकडून तुम्हाला ओव्हर ड्राफ्ट ची सुविधा दिली जाते या अंतर्गत तुम्ही बँकेत पैसे नसताना सुद्धा दहा हजार रुपयांपर्यंतचे पैसे काढू शकतात.

खरे तर जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा आपण कर्ज घेण्याचा विचार करतो. मात्र, अनेक बँका त्यांच्या खातेदारांना ओव्हरड्राफ्ट ही खास सुविधा उपलब्ध करून देत आहेत. यामुळे बँक अकाउंट मध्ये पैसे जमा नसतानाही आपण पैसे काढून आपल्या गरजा पूर्ण करू शकता.

ओव्हरड्राफ्ट सुविधेमुळे खात्यात पैसे नसतानाही ठराविक मर्यादेपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा मिळत असते. जनधन खातेदारांना ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध करून दिले जाते या खातेधारकांना 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो.

महत्त्वाची बाब अशी की यासाठी वेगळा अर्ज करावा लागत नाही. ग्राहक थेट ATM किंवा नेटबँकिंगच्या माध्यमातून रक्कम काढू शकतात. पण, ओव्हरड्राफ्टवर व्याज दररोज आकारला जातो, त्यामुळे सामान्य कर्जापेक्षा थोडं महाग असतं.

तरीही तातडीच्या गरजेसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही सुविधा मिळवण्यासाठी खाते आधार क्रमांकाशी जोडलेलं असणं आवश्यक आहे आणि 18 ते 65 या वयोगटातील नागरिक याचा लाभ घेऊ शकतात.

जर तुम्ही तुमचे बेसिक सेव्हिंग अकाउंट कमीत कमी सहा महिने व्यवस्थित चालवले असेल, तर तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंतचा ओडी म्हणजे ओवरड्राफ्ट सहज मिळू शकतो.

पण यासाठी तुमचे अकाउंट आधार क्रमांकाशी जोडलेले असावे. ही सुविधा जनधन खातेधारकांसाठी सुद्धा उपलब्ध राहणार आहे. पण यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News