मोठी बातमी : देशातील ‘या’ मोठ्या सरकारी बँकेने एफडी व्याजदरात सुधारणा केली ! आता ग्राहकांना मिळणार अधिकचा परतावा

Published on -

Banking FD News : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. देशातील एका बड्या बँकेने एफ डी व्याजदरात सुधारणा केली आहे.

आयसीआयसीआय या देशातील प्रमुख खाजगी बँकेने आपले एफडीचे व्याजदर रिवाईस केले असून हे नवीन व्याजदर एक नोव्हेंबर 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.

आयसीआयसीआय बाबत बोलायचं झालं तर ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगला परतावा देत आहे.

दरम्यान बँकेकडून तीन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीच्या व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण आयसीआयसीआय बँकेचे नवीन व्याजदर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आयसीआयसीआय बँकेचे एफ डी वरील व्याजदर
7 दिवसांपासून ते 29 दिवस कालावधीचा एफ डी साठी : सामान्य ग्राहकांना तीन टक्के आणि सीनियर सिटीजन ग्राहकांना 3.50%.
30 दिवसांपासून ते 45 दिवस कालावधीच्या एफ डी साठी : सामान्य ग्राहकांना 3.50% आणि सीनियर सिटीजन ग्राहकांना 4%.

४६ दिवस ते ६० दिवस : सामान्य लोकांसाठी – ४.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.75 टक्के
61 दिवस ते 90 दिवस : सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.०० टक्के

91 दिवस ते 184 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.२५ टक्के
185 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.२५ टक्के

271 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50 टक्के
एक वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी 6.70 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.20 टक्के

15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.80 टक्के
18 महिने ते 2 वर्षे : सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के

2 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सर्वसामान्यांसाठी 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.40 टक्के.
5 वर्षांची कर बचत FD: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!