ब्रेकिंग : उद्या बँक बंद राहणार ! आरबीआयचा निर्णय, कारण काय ? फेब्रुवारी 2025 मधील संपूर्ण सुट्ट्यांची माहिती

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फेब्रुवारी 2025 मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील असे जाहीर केले आहे. या सुट्ट्यांमध्ये प्रादेशिक उत्सव, राष्ट्रीय दिवस, आठवड्याच्या सुट्ट्या आणि बँकांच्या नियमित विश्रांतीचे दिवस यांचा समावेश आहे. बँका दर रविवारी आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या तसेच चौथ्या शनिवारी बंद राहतात.

Published on -

Banking Holiday : येत्या चार दिवसांनी फेब्रुवारी चा पहिला पंधरवडा उलटणार आहे. हा 28 दिवसांचाच महिना आहे, अन त्यातल्या त्यात या महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. उद्या बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी, सुद्धा देशातील काही भागांमधील बँका बंद राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उद्या हिमाचल प्रदेशातील सर्व बँका बंद राहणार आहेत.

हा निर्णय गुरु रविदास जयंतीच्या निमित्ताने घेण्यात आला असल्याचे आरबीआयचे अधिकृत संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे. उत्तर भारतात हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. गुरु रविदास हे समाजसुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होते, त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर केली जाते.

मात्र, ही सुट्टी प्रादेशिक स्वरूपाची असल्यामुळे इतर राज्यांमध्ये बँकिंग सेवा सुरू राहणार आहे. अर्थातच आपल्या महाराष्ट्रात देखील उद्या बँका सुरूच राहतील. पण, हिमाचल प्रदेशातील ग्राहकांनी आपली बँकिंग कामे नियोजित करून पूर्ण करावीत, जेणेकरून सुट्टीमुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. दरम्यान, आता आपण फेब्रुवारी महिन्यात कोणकोणत्या दिवशी बँकांना सुट्टी राहणार याची यादी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फेब्रुवारी 2025 मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील असे जाहीर केले आहे. या सुट्ट्यांमध्ये प्रादेशिक उत्सव, राष्ट्रीय दिवस, आठवड्याच्या सुट्ट्या आणि बँकांच्या नियमित विश्रांतीचे दिवस यांचा समावेश आहे. बँका दर रविवारी आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या तसेच चौथ्या शनिवारी बंद राहतात. याशिवाय, काही राज्यांमध्ये स्थानिक सण किंवा विशेष प्रसंगावेळी अतिरिक्त सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे, ग्राहकांनी आवश्यक बँकिंग व्यवहार वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

फेब्रुवारी महिन्यात विविध ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. आज 11 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये बँक सुट्टी असेल, तर 12 फेब्रुवारी रोजी हिमाचल प्रदेशात गुरु रविदास जयंतीनिमित्त बँका बंद राहतील. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी इंफाळमध्ये लोई न्गाई सणामुळे बँका बंद असतील. महाराष्ट्रात 19 फेब्रुवारीला अर्थातच शिवप्रभूंच्या जयंती दिनानिमित्त बँकांना सुट्टी राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बेलापूर, मुंबई आणि नागपूर येथे बँका बंद राहणार आहेत. याशिवाय, 20 फेब्रुवारी रोजी मिजोराम आणि अरुणाचल प्रदेशात राज्य दिनानिमित्त ऐझॉल आणि इटानगर येथे बँका बंद राहतील. 26 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, ऐझॉल, भोपाळ, चंदीगड, देहरादून आणि शिमला येथे बँकिंग सेवा उपलब्ध राहणार नाहीत, त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या ग्राहकांनी आपल्या व्यवहारांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

बँकिंग आठवड्याच्या नियमित सुट्ट्यांचा विचार करता, फेब्रुवारी महिन्यातील रविवार (16 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी) तसेच दुसरा शनिवार (10 फेब्रुवारी) आणि चौथा शनिवार (24 फेब्रुवारी) या दिवशी देखील बँका बंद राहतील. या आठवड्याच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, वरील प्रादेशिक सुट्ट्या काही विशिष्ट राज्यांमध्ये लागू होतील. त्यामुळे, जर तुम्हाला रोख रक्कम काढणे, चेक क्लिअरन्स करणे किंवा इतर कोणतेही बँकिंग काम करायचे असेल, तर या सुट्ट्यांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे.

तथापि, बँक बंद असली तरी ऑनलाइन बँकिंग, UPI पेमेंट्स आणि ATM सेवा 24×7 उपलब्ध राहतील, त्यामुळे ग्राहकांना दैनंदिन व्यवहारांमध्ये अडचण येणार नाही. डिजिटल बँकिंगचा उपयोग करून ग्राहक आपल्या गरजा सहज पूर्ण करू शकतात. मात्र, काही मोठ्या बँकिंग सेवांसाठी, जसे की कर्ज प्रक्रिया, मोठ्या रकमेचे व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि नवीन खात्यांचे व्यवहार यासाठी बँकेमध्ये प्रत्यक्ष भेट द्यावी लागते. त्यामुळे, ग्राहकांनी आपली बँकिंग गरजा लक्षात घेऊन सुट्ट्यांपूर्वीच आवश्यक गोष्टी पूर्ण कराव्यात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News