एप्रिल मध्ये किती दिवस बँकांना सुट्ट्या राहणार ? RBI ने जाहीर केली यादी, वाचा सविस्तर….

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात काही दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने आठवडी सुट्ट्यासहित एकूण किती दिवस बँका बंद राहतील याची माहिती दिली आहे. दरम्यान आता आपण एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची सविस्तर यादी पाहूयात.

Published on -

Banking Holiday : मार्च महिना जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या सात आठ दिवसात मार्च महिन्याची सांगता होणार आहे आणि त्यानंतर एप्रिल महिन्याची सुरुवात होईल. खरंतर मार्च महिन्यात होळी, धुलीवंदन रंगपंचमी गुढीपाडवा असे अनेक सण साजरे करण्यात आले आहेत.

दरम्यान एप्रिल महिन्यातही भारतात अनेक सण साजरे होणार आहे. या सणामुळे एप्रिल महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरेतर, एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष देखील सुरू होणार आहे.

दरम्यान नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात काही दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने आठवडी सुट्ट्यासहित एकूण किती दिवस बँका बंद राहतील याची माहिती दिली आहे.

यामुळे जर तुम्हालाही एप्रिल महिन्यात बँकेची निगडित काही कामे करायची असतील तर या सुट्ट्यानुसारच तुम्हाला तुमच्या बँकांच्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान आता आपण एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची सविस्तर यादी पाहूयात.

एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची यादी

१ एप्रिल : १ एप्रिल २०२५ रोजी वार्षिक इन्व्हेंटरी प्रक्रियेमुळे सर्व व्यावसायिक बँका बंद राहणार आहेत. हा एक आवश्यक प्रक्रियेसाठीचा दिवस असून, यामध्ये बँका आपल्या आर्थिक नोंदींचे संकलन आणि तपासणी करतात.
६ एप्रिल (रविवार) : रामनवमी
१० एप्रिल (गुरुवार): भगवान महावीर जयंती
१२ एप्रिल (शनिवार): दुसरा शनिवार
१३ एप्रिल (रविवार): साप्ताहिक सुट्टी
१४ एप्रिल (सोमवार): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१८ एप्रिल (शुक्रवार): गुड फ्रायडे
२१ एप्रिल (सोमवार): गरिया पूजा (फक्त अगरतळा येथे)
२६ एप्रिल (शनिवार): चौथा शनिवार
२९ एप्रिल (सोमवार): भगवान परशुराम जयंती
३० एप्रिल (मंगळवार): बसव जयंती आणि अक्षय तृतीया (फक्त बंगळुरू येथे)

दरम्यान, जाणकार लोकांनी बँकाच्या या सुट्ट्या पाहूनच ग्राहकांनी आपल्या कामांचे वेळापत्रक तयार करावे असा सल्ला दिला आहे. बँकिंग सुट्ट्यांची नोंद घ्यावी आणि आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन तद्नुसार करावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe