Banking Holiday : उद्या संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा सण साजरा होणार आहे. खरेतर, भारतात महाशिवरात्री आणि होळीसारख्या मोठ्या सणांच्या निमित्ताने सरकारी आणि खासगी बँकांमध्ये सुट्टी असते. यंदा उद्या म्हणजेच 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीचा सण साजरा होणार आहे आणि या दिवशी महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) दरवर्षी बँक सुट्टीची यादी जारी करत असते, ज्यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक उत्सवांच्या आधारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्टी निश्चित केली जाते. दरम्यान आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी देशातील कोणत्या राज्यांमध्ये बँका बंद राहणार? आणि मार्च महिन्यात देशातील बँकांना किती दिवस सुट्ट्या राहणार? याबाबतही आज आपण माहिती पाहणार आहोत.

महाशिवरात्रीला या राज्यांमध्ये बँका बंद राहणार
26 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थात बुधवारी महाशिवरात्री साजरी होणार आहे. महाशिवरात्री हा देशातील अनेक राज्यांमध्ये साजरा होणारा एक महत्त्वाचा सण असून या दिवशी, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथे बँका बंद राहणार आहेत.
मार्च महिन्यात या तारखांना बँकांना सुट्टी राहणार
5 मार्च 2025 : पंचायती राज निमित्ताने सिक्किम ओडिषा आणि पंजाब या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी राहील.
7 मार्च 2025 : चापचर कुट निमित्ताने या दिवशी मिझोराम राज्यात बँकांना सुट्टी राहणार आहे.
14 मार्च 2025 : याओसांग निमित्ताने मणिपूर राज्यात बँकांना सुट्टी राहणार आहे. तसेच होळी सणाच्या निमित्ताने या दिवशी अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, मिझोरम, मिझोरम, नागालँड, ओडिशा, पुजब, राजथान, सांथन, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे. दोल जत्रा अन दोल पौर्णिमा निमित्ताने या दिवशी पश्चिम बंगाल राज्यात बँकांना सुट्टी राहणार आहे.
22 मार्च 2025 : बिहार डे निमित्ताने या दिवशी बिहार राज्यात बँकांना सुट्टी राहील.
23 मार्च 2025 : या दिवशी भगत सिंग यांच्या शहीद दिवसानिमित्ताने बँकांना सुट्टी राहणार आहे.
25 मार्च 2025 : धुलंडी निमित्ताने राजस्थानात या दिवशी बँकांना सुट्टी राहील.
28 मार्च 2025 : जमात उल विदा निमित्ताने या दिवशी छत्तीसगड राज्यात बँकांना सुट्टी राहणार आहे.
30 मार्च 2025 : उगडी निमित्ताने या दिवशी गुजरात कर्नाटक तेलंगाना आणि राजस्थान या राज्यात बँकांना सुट्टी राहील. या दिवशी गुढीपाडव्याचा सण सुद्धा राहणार आहे यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रात या दिवशी सुट्टी राहील. तसेच तामिळनाडू राज्यात तेलुगु न्यू इयर निमित्ताने या दिवशी बँकेला सुट्टी राहणार आहे.
31 मार्च 2025 : ईद-उल-फितूर या निमित्ताने अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, केरळ, मड्या प्रदेश, महाराता, मेघाल्या, मेघलाय मिझोरम, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा या राज्यात बँकांना सुट्टी राहणार आहे.