बँकेच्या टाइमिंगमध्ये होणार मोठा बदल ! सकाळी 9:45 वाजता खुली होणार बँक, आठवड्यात किती दिवस कामकाज ? पहा…

बँक खातेधारकांसाठी आणि बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बँकेच्या वेळापत्रकात एक मोठा बदल अपेक्षित आहे. दरम्यान आता आपण बँकेच्या वेळापत्रकात नेमका काय बदल होणार याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Banking News : बँक ग्राहकांसाठी एक कामाची बातमी बातमी समोर येत आहे. जर तुमचेही एखाद्या बँकेत अकाउंट असेल किंवा जर तुम्ही किंवा तुमच्या परिवारातून कोणी बँकेत कामाला असेल तर आजची ही बातमी तुमच्या विशेष कामाची राहणार आहे.

कारण की आता बँकेचे वेळापत्रकात मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. अगदीच खेड्यापाड्यातील लोक सुद्धा बँकिंग व्यवस्थेसोबत जोडले गेले आहेत.

विशेषतः केंद्रातील मध्ये सरकारने जनधन योजना सुरू केल्यानंतर बँक खाते धारकांची संख्या वाढली. दरम्यान आता बँकिंग सेक्टर मध्ये एक मोठा चेंज येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बँकेच्या सध्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार सुरु आहे. दरम्यान आता आपण बँकेचे वेळापत्रक नेमका काय बदल होणार? याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

बँकेच्या वेळापत्रकात काय बदल होणार?

मिळालेल्या माहितीनुसार बँक कर्मचाऱ्यांच्या रजेचे नियम आता बदलले जाणार आहेत, यामुळे देशातील कोट्यवधी बँक ग्राहकांवर परिणाम होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या बँक कर्मचाऱ्यांना एका महिन्यात चार रविवारी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी साप्ताहिक सुट्टी असते.

म्हणजेच एका महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना सहा दिवस साप्ताहिक सुट्टी असते. पण आगामी काळात यामध्ये बदल होणार असून महिन्यातील सर्व शनिवारी आणि रविवारी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे असा प्रस्ताव तयार सुद्धा झाला असल्याचे सांगितले जात आहे.

अर्थातच आगामी काळात बँक कर्मचाऱ्यांना एका महिन्यात 4 शनिवार आणि चार रविवार असे आठ दिवस सुट्टी राहणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून देशभरातील बँक कर्मचारी पाच दिवसांचा कामाचा आठवडा केला गेला पाहिजे अशी मागणी करत आहेत. दरम्यान आता पाच दिवसांचा कामाचा आठवडा करणेबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बँकांमध्ये पाच दिवसांचा कामाचा आठवडा करणेबाबत भारतीय बँक्स कॉन्फेडरेशन आणि कर्मचारी संघटनांमध्ये मागे एक करार सुद्धा झाला आहे. दरम्यान आता या प्रस्तावाला सरकारची मंजुरी अपेक्षित आहे. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू होणार आहे. 

बँकेचा टाइमिंग पण बदलणार

जर सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर शनिवारी आणि रविवारी बँकांना सुट्टी राहणार आहे. भारतीय बँकिंग महासंघ आणि बँक कर्मचारी संघटनांनी याबाबतचा करार केला आहे. हा करार एक वर्षापूर्वी झाला होता आणि आता याला सरकारकडून हिरवा कंदील मिळणार अशी शक्यता आहे.

दरम्यान हा निर्णय झाल्यास बँकांचे कामकाजाचे तास देखील बदलणार आहेत. महत्त्वाची बाब अशी की, सरकारने याला मंजुरी दिल्यास देशातील सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांना हा नियम लागू राहणार आहे. यासाठी आरबीआयकडूनही मान्यता घेतली जाईल.

आरबीआय बँकिंग क्षेत्रावर लक्ष ठेवते. निर्णय लागू झाल्यानंतर, कामाचे तास ठरवण्याचे काम फक्त आरबीआय करणार आहे. जर बँकांमध्ये पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही पॉलिसी लागू झाली तर बँकेच्या ओपनिंग आणि क्लोजिंग टाईम मध्ये बदल होणार आहे.

हा निर्णय झाल्यानंतर देशभरातील बँका सकाळी पावणेदहा वाजता उघडतील आणि संध्याकाळी साडेपाच वाजता बंद होतील. सध्या बँका सकाळी दहा वाजता उघडतात आणि सायंकाळी पाच वाजता बंद होतात. म्हणजेच नवा निर्णय झाल्यानंतर बँकांचे दैनंदिन कामकाज 45 मिनिटांनी वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe